धामणगांव बढे (हॅलो बुलढाणा) रोहिनखेड़ येथील जिल्हा परिषद उर्दु उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे रिक्त असलेले पद भरण्यात यावे व शाळेची नविन इमरत सुद्धा बांधण्यात यावीअशी मागणी
रोहिनखेड येथील नागरिकांनी व शालय व्यवस्थापण समिती चे अध्यक्ष यांनी जिल्हा परिषद सी.ओ.यांना निवेदन द्वारे केली आहे.
जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा रोहिनखेड़ येथे शाळेत विद्यार्थि संख्या 452 असून या शाळेत 6 शिक्षकांचे पद रिक्त असल्याने शालय विद्यार्थि यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेस या शालेत विद्यार्थ्यांसाठी वर्ग खोल्या कमी असल्याने शाळा करी मुलांची गैरसोय होत आहे.
6 शिक्षकांचे रिक्त पद भरण्यात यावे व शाळा इमारतीची दुरुस्ती करावी अशी मागणी बुलढाणा जिल्हा परिषद चे सि.ओ.कुलदीप जंगम यांनानिवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन देता वेळी नरेश शेळके जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रईस कुरेशी, उपाध्यक्ष सोहेल भाई, मोहम्मद निसार, अजीम शाह
सुफियान दिवान,साजिद सरदार शिक्षक मो.जाकिर आदि उपस्थित होते.










