spot_img
spot_img

शरदचंद्र पवार ‘सिर्फ नाम ही काफी है!’ -ज्येष्ठांचा आशीर्वाद व युवकांची साथ, बदलणार गायत्री शिंगणेंचे भाग्य?

सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा) राजकारणातले मुरब्बी नेते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची राजकीय ताकद कोणाला माहित नाही? ‘सिर्फ नाम ही काफी है!’ असे त्यांच्या बाबतीत बोलले जाते.त्यांनी आता गायत्री शिंगणे यांना सिंदखेडराजा विधानसभा निवडणुकीत उतरविण्यासाठी चंग बांधला आहे. दरम्यान 5 ऑगस्ट रोजी जनसामान्याच्या अनेक मागण्या मंजूर करण्यासाठी मातृ तीर्थ सिंदखेड राजा तहसील कार्यालयावर जनसामान्याचा जनक्रांती आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढणे या प्रमुख मागणीसह इतरही अनेक मागण्या या मोर्चामध्ये मांडण्यात येणार आहेत, या जनक्रांती आक्रोश मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष सौ रेखाताई खेडेकर करणार आहेत. माजी आमदार रेखाताई खेडेकर यांच्या नेतृत्वात होत असलेल्या या मोर्चामध्ये श्री नरेश यांना, श्री प्रसेंजित पाटील अशी मातब्बर मंडळी ही उपस्थित राहणार आहे.तरी या मोर्चाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून एक दिवस सिंदखेडराजा मतदारसंघाच्या विकासासाठी द्यावा असे आवाहन, पक्षाच्या जिल्हा महिला कार्याध्यक्ष गायत्री गणेश शिंगणे यांनी केले आहे.

@ जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

उद्या हा मोर्चा संपल्यानंतर सिंदखेडराजा मतदार संघातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी,व मागण्या यावर पूर्णवेळ कार्य करण्यासाठी कु. गायत्री शिंगणे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सौ रेखाताई खेडेकर यांच्या हस्ते होणार आहे.या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून ज्येष्ठांचे आशीर्वाद व युवकांच्या साथीने सिंदखेड राजा मतदारसंघांमध्ये एक परिवर्तनाची नांदी घडवुन आणण्याचा आमचा प्रयत्न असेल, तरी परिवर्तनाच्या या लढाईत आपल्या लेकीला आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने मोर्चाला व उद्घाटनालाही उपस्थित रहावे अशी साद मतदारसंघातील सर्व जनतेला आपण करीत आहोत,असे गायत्री शिंगणे म्हणाल्या.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!