7.5 C
New York
Monday, November 25, 2024

Buy now

spot_img
spot_img

वंचितची ‘आरक्षण बचाव यात्रा’ कधी? -जिल्हा वासियांनी सहभागी व्हावे – महीला प्रदेशाध्यक्ष सविताताई मुंढे यांचे आव्हान

देऊळगांव राजा (हॅलो बुलढाणा/ संतोष जाधव) बुलढाणा जिल्ह्यात एस.सी. एस.टी. ओबीसी बांधवाच्या न्याय हक्कासाठी लढाई लढण्याकरिता वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीने काढण्यात येणाऱ्या आरक्षण बचाव यात्रा 6 ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्ह्यात दाखल होणार आहे.आज दि. 3 ऑगस्ट रोजी शनिवारला वंचित बहुजन आघाडीच्या महिला प्रदेशउपाध्यक्ष सविताताई मुंढे यांनी वंचित बहुजन आघाडी संपर्क कार्यललयात आयोजित पत्रकार परिषदेत आरक्षण बचाव यात्रेचे उद्दिष्ट काय आहे यावर सखोल अशी माहिती दिली.

यामध्ये ओबीसी आरक्षण वाचले पाहिजे,एससी, एसटी, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे, ओबीसी च्या विद्यार्थ्यांना सुद्धा एससी, एसटी प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते ती जशाचं तसें लागू झाली पाहिजे, 100 ओबीसी आमदार निवडून आणावे, 55 लाख बनावाट कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावे या मागणीसह आरक्षण बचाव यात्रा काढणार आहे. माहिती कार्यालयात सदर आरक्षण बचाव यात्रा सकाळी 11 वाजता मेहकर दुपारी 12:30 वाजता चिखली बुलढाणा 2:00 वाजता धाड 3:30 वाजता जाफराबाद 4:30 वाजता देऊळगाव राजा 5:30 वाजता महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष सविताताई मुंढे यांच्या संपर्क कार्यालयासमोर ओबीसी बांधवांतर्फे सत्कार सिंदखेडराजा सायंकाळी 6:00 वाजता व मुक्काम जालना येथे होणार आहे बुधवारी 7 ऑगस्ट ला छत्रपती संभाजीनगर येथे दुपारी बारा वाजता यात्रेचा समारोप जाहीर सभा होईल. तालुक्यातील नागरिकांनी एस.सी. एस.टी. ओबीसी बांधावाच्या लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी तालुका अध्यक्ष उद्धव वाकोडे, मनोज इंगळे यांच्यासह आदि उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!