बुलढाणा (हॅलो बुलढाणा) केवळ पैसे आणि कमिशन साठी ठेकेदार सर्वसामान्य नागरिकांचे वाटोळे करण्यात धन्यता मानत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत.गेल्या दोन महिन्यांपासून वाडी जलम रोडची नाली खोदून ठेवल्याने नागरिकांना या नाल्यातील दुर्गंधीयुक्त पाण्याचा जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे.
वाडी जलम रोडची नाली घाणीने भरली असून दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे.हि नाली पीडब्लू डी ठेकेदारांनी खोदून ठेवली.दोन महिन्यापासून काम ठप्प आहे.ठेकेदाराला कामासंदर्भात नागरिक बोलले तर पीडब्ल्यूडी चा ठेकेदार अंगावर धावून येतो.धमकी सुद्धा देतो.सध्या पावसाळी दिवस असल्याने हि नाली
घाण पाण्यामुळे शिगोशिग भरलेली आहे. या तुंबलेल्या पाण्यातून अनेक प्रकारचे रोग पसरले आहे.मलेरिया- डेंगूची लागण होत आहे.तात्काळ हा प्रश्न मार्गी निघाला नाहीतर याला जबाबदार ठेकेदार राहील,असे नागरिकांनी म्हटले आहे.










