बुलढाणा (हॅलो बुलढाणा/राजेंद्र घोराडे) राजकारणात कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नसतो, काल “राजे” असलेले लोक आज ‘वंचित’ म्हणून जगताना दिसतात.येथे शिंदे गटात ‘शिंदेना'(विजयराज) स्थान नसते,यापेक्षा अधिक काय सांगावे? वरील विधानातील गमतीचा भाग सोडून दिला,तरी सर्वांचे लक्ष लागून असलेला बुलढाणा विधानसभा मतदारसंघ काय म्हणतो?
बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय गायकवाड हे जरी “मै नही तो कौन बे” म्हणत असतील तरी, ज्याप्रकारे जिल्हा मुख्यालयात इतर पक्षांच्या गुप्त बैठका सुरु आहेत,महाविकास आघाडीच्या नेत्यानकडून ज्याप्रकारे परस्पर सामंजस्य (वरवर का होईना) दाखविले जात आहे,तसा प्रकार महायुतीमध्ये दिसून येत नाही,संजूभाऊ सक्षम आहेत हे खरेच पण बुलढाणा भाजपा संजूभाऊसोबत आहे का?? हा जरा अवघड प्रश्न आहे.त्यावरून संजूभाऊंच्या रथाचे चाक एनवेळी युद्धभूमीत फसते की काय? अशी शंका निर्माण होण्यास पुरेसा वाव आहे.
लोकसभेच्या चष्म्यातून विधानसभा पाहायची ठरली,आणी गणिते जर सारखी राहिली तर संजूभाऊंना लोकसभेत मिळालेली मते ही शिवसेना उबाठा गटापेक्षा कमी होती,आणी त्यात जर रविकांत तुपकर यांना मिळालेली मते जोडली तर आकडा संजूभाऊची झोप उडण्यास पुरेसा आहे,लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार जरी ना. प्रतापराव असतील तरी , खरी लढत मात्र संजय गायकवाड आणि रविकांत तुपकर यांच्यात, होईल असे वाटत असतानाच शिवसेना उबाठा गटाच्या जुन्या शिलेदारांनी “सच्चा शिवसैनिकांना साथ” अशी आर्त हाक देऊन नरेंद्र खेडेकर यांना बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळवून दिली,आणि अनपेक्षितपणे संजय गायकवाड व रविकांत तुपकर या दोघांचीही ‘शिकार’ उबाठा च्या सैनिकांनी केली.
त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महत्त्व अचानकपणे बुलढाणा मतदारसंघात वाढायला लागले, आणि येथील महाविकास आघाडीचे तिकीट शिवसेना (उबाठा) ला भेटण्याची शक्यता वाढली असून,या सहानभूतीच्या लाटेत निवडून येण्यासाठी शिवसेना (उबाठा) गटाकडून चांगली तयारी सुरु झाली आहे.उबाठा गटाच्या नेत्यांनी संकटाच्या काळात ठेवलेला संयम त्याचप्रमाणे संथ पण सतत सुरु ठेवलेले समाजकार्य कदाचित त्यांना या निवडणुकीमध्ये कामी येईल.जर वेळेवर विजयराज शिंदे यांनी सर्वांना चितपट करून शिवसेना उबाठा चे तिकीट मिळवले तर त्यांना अप्रत्यक्षपणे भाजपाची साथ मिळेल अशा चर्चा आहेत.
संदीप शेळके सारख्या तरुण नेत्याने प्रवेश घेतल्याने,उबाठा बद्दल अधिक चर्चा होत आहेत पण संदीप शेळके यांचे पक्षातील नवखेपण,आणी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांची जालिंदर बुधवत यांना मिळत असलेली पसंती पाहता ते विधानसभा निवडणूक लढण्याचे चिन्ह नाहीत पण मराठा कार्ड जालिंदर बुधवत यांचेबाबत जातीचा आधार नसल्याने किती फायदेशीर ठरेल तेही समोर संजय गायकवाड असताना हा संशय आहे.
याबाबी पाहता डॉ. मधुसूदन सावळे हे शिवसेना उबाठा चे उमेदवार असू शकतात. शिवसेनेचा इतिहास पाहता “निष्ठावंतांना संधी” या तत्वावर पाहिले असता डॉ. मधुसूदन सावळे या नेत्याला तिकीट मिळण्याचे संकेत अधिक दिसतात,उच्च विद्याविभूषित असलेले डॉ.सावळे,निष्ठावंत,आर्थिक,सामाजिक क्षमता,वेळेवर कामी येणारी जात, या सर्व बाबींचा विचार करता लढण्यासाठी प्रबळ उमेदवार आहेत.
त्यांची निष्ठा,संयम, डॉक्टर मधुसूदन सावळे यांना फलप्राप्ती करून देते का ? हे पाहणे रंजक ठरेल.
ये सब कुछ मुमकिन हो सकता है..!
या सर्व राजकीय घडामोडीत ‘एक नारी सब पर भारी’ उमेदवार म्हणून जयश्री ताई शेळके यांचे नाव पण आघाडीवर पहिल्या पसंदित असून ते नाकारता येत नाही