बुलढाणा (हॅलो बुलढाणा)‘बदलले घालून लेखणीचे घाव, शाहिरीने घेतला जन-मनाचा ठाव…!’असे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस आज आमदार संजय गायकवाड यांनी जयस्तंभ चौकात समाज बांधवांच्या साक्षीने जल्लोषात साजरा केला.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्याने आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी जयस्तंभ चौकातील स्मारकस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आज १ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती उत्सवाच्या निमित्याने बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक परिसरामध्ये आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून पूर्णत्वास आलेले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकस्थळी पुष्पहार अर्पण करून धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी विनम्र अभिवादन केले, यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी तसेच शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी तसेच शिवसैनिक,समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.