बुलढाणा (हॅलो बुलढाणा) झी टॉकीज या मराठी वाहिनीवर दररोज प्रसारित होत असलेला ‘गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा’ या अध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये राधेश्याम चांडक उर्फ भाईजी यांच्या उपक्रमाचा विशेष उल्लेख करण्यात आला. ही बाब बुलढाणा जिल्ह्या साठी गौरवाची असून भाईजींच्या उपक्रमाचे आशिया खंडात सर्वत्र स्वागत होत आहे.
कीर्तन हे लोकजागृती, समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. ‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।।’ असं म्हणत आजवर असंख्य कीर्तनकारांनी कथा, विनोद, दैनंदिन घडामोडी यांच्या आधाराने निरुपण करत समाजातील अपप्रवृत्तींना आळा घालण्याचा प्रयत्न केला. रंजनातून अंजनाचा हा वसा आता झी टॅाकीज या चित्रपट वाहिनीच्या माध्यमातून आपल्या भेटीला येत असतो. दरम्यान आजच्या कीर्तनात
शेतकऱ्यांचे पीक शेतातून आणले की या पिकाला ठेवण्यासाठी घरी जागा नसते हे पीक सुरक्षित ठेवण्यासाठी बुलढाणा अर्बन चे सर्वेसर्वा सहकार महर्षी राधेश्याम चांडक यांनी संपूर्ण आशिया खंडात जवळपास 700 गोडाऊन उभारून दिले.कमीत कमी व्याजदर असणारी अशी पतसंस्था राधेश्याम चांडक यांची आहे.व्यवहारिक दृष्टिकोन तर सोडा,त्यांचा आध्यात्मिक दृष्टिकोन मोठा आहे.महाराष्ट्रात गोशाळा उभ्या केल्या तसेच गोरगरिबांच्या शिक्षणासाठी त्यांनी शिक्षण संस्था उभारल्या.अनेक मोठमोठे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन भाईजी करीत असतात. त्यांना कोटी कोटी धन्यवाद देऊन महाराजांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.