बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील देऊळघाट व धामणगाव बढे या दोन ग्रामपंचायतींना येत्या सहा महिन्यात नगरपंचायत म्हणून स्थापन केले जाणार आहे. या संदर्भात आ संजय गायकवाड यांच्या मागणीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच संबंधित विभागाला कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.त्यामुळे या दोन गावांना सर्व सुविधा उपलब्ध होणार आहे.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे धडाडीचे आमदार संजय गायकवाड यांनी विकासाचा धडाकाच लावला आहे. विधानसभा मतदारसंघातील देऊळघाट लोकसंख्या अंदाजे 23 हजार पेक्षा अधिक झाली आहे. तर धामणगावबढेची लोकसंख्या 11335 आहे. सद्यस्थितीत सदर ग्रामपंचायत हद्द व परिसराची मुख्य बाजारपेठ सदर दोन्ही गाव आहे. या ठिकाणी असून गावात 600 पेक्षा अधिक लहान मोठे व्यावसायिक आहेत. परंतु ग्रामपंचायत असल्याने सदर गावाचे उत्पन्न अतिरिक्त कमी आहे. सदर ग्रामपंचायत निधी अभावी नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करू शकत नाही. तसेच सदर ग्रामपंचायत गावांच्या लोकसंख्येचा विचार करता या गावात आवश्यक त्या आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा, विद्युत, क्रीडा सुविधा पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अनुशेष आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायती नवीन नगरपंचायत स्थापना झाल्यास या गावाचा गतीने विकास होऊ शकतो तसेच स्थानिक नागरिकांना आवश्यकता सुविधा सुद्धा पुरवणे शक्य होऊ शकतात. त्याकरिता सदर ग्रामपंचायती ठिकाणी नवीन नगरपंचायत स्थापन करावे अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाला तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.त्यामुळे येत्या सहा महिन्यातच या दोन्हीही ग्रामपंचायती लवकरच नगरपंचायत म्हणून स्थापन होणार आहे.
विकासाला मिळणार गती
शहराच्या विकासाला गती मिळावी याकरिता शासनाच्या वतीने नगरपालिका मार्फत विविध योजना राबविल्या जातात ज्यामध्ये नगरोत्थान वैशिष्ट्यपूर्ण रस्ते अनुदान व पर्यटन अशा अशा योजनांवर स्वतंत्रपणे कोट्यावधीचा निधी दिला जातो त्यामुळे विकासाला गती मिळते त्याच धर्तीवर आता देऊळघाट व धामणगाव बढे नगरपंचायत ला देखील निधी मिळणार आहे ज्यामुळे या दोन्ही गावाचा विकास हा झपाट्याने होईल यात शंका नाही अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी दिली.