spot_img
spot_img

पैशाचे पिकांना ‘वेटोळे ‘ तर पैशांचे ‘वाटोळे!’ -पीक फस्त करणाऱ्या अळीची वळवळ! -यासाठीच आंदोलन होत असतील का ?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सध्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन का होत असतील बरं? हे समजण्या इतपत कुणीच दूधखुडे नाहीत.विधानभा तोंडावर आल्यात.त्यामुळे शेतकऱ्यांचा पुन्हा वापर करून राजसत्ता मिळवण्यासाठी हे सर्व घालमेल आहे.

एकीकडे चक्री भुंगा,शंकी शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न कुरतडत आहे. ‘पैशाचे ‘ पिकांना वेटोळे तर पैशांचे वाटोळे होत आहे. हिरवी कोवळी पाने फस्त करणाऱ्या अळ्यांची वळवळ सुरू आहे.पिक विमा,अतिवृष्टीची नुकसान भरपाई अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नाही.जे सत्तेत बसलेल्यांना जमत नाही ते आंदोलन करणाऱ्यांना काय जमणार आहे?असा सूर शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

बुलढाणा जिल्हा शेतकरी आत्महत्या ने ग्रस्त आहे. त्यांना मागील अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळाली नाही.पिक विमा पासून अद्यापही अनेक शेतकरी वंचित आहेत.या खरीप हंगामात कर्ज काढून, पदरमोड करूनशेतकऱ्यांनी पेरणी केली.पेरणीच्या वेळेस एकाही नेत्याने शेतकऱ्यांना साथ दिली नाही.दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने तारले आहे. तर दुसरीकडे मका पिकावर पडलेल्या लष्करी अळीने मारले आहे. असे म्हणण्याची वेळ मका उत्पादक शेतकर्‍यांवर आली आहे.शेतात शेती करणे हे शेतकर्‍यांचे कर्तव्य आहे, जे ते अत्यंत विश्वासाने करतात. परंतु नेते आपले काम चांगल्या प्रकारे करीत नाहीत, शासनाने दिलेल्या योजनांचा लाभ घेण्यास अडचणी निर्माण करतात.निवडणुका आल्या की,शेतकऱ्यांना भुलथापा देतात.विधानसभानिवडणूक जवळ आल्याने आता शेतकऱ्यांच्या समस्येसाठी आंदोलने सुरू झाली आहेत.आता तरी शेतकऱ्यांनी सावध पवित्रा घ्यायला हवा..विकास कामे करणाऱ्या आणि शेती समस्या सोडविणाऱ्या उमेदवारांना मत द्यावे,असे जाणकारांचे मत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!