साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा) प्रस्तावित अन्यायकारक बदल्या रद्द करणे व इतर प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने विदर्भ पटवारी संघ खामगाव यांनी आंदोलन छेडले आहे. काही झाले तर तलाठीच जबाबदार हा पायंडा मोडून काढण्यासाठी अन्यायाच्या ऐवजी न्याय द्या. असे निवेदन 29 जुलै 2024 ला विदर्भ पटवारी संघ खामगाव यांनी दिले तसेच सामूहिक रजेचा अर्ज ना. तहसीलदार सोनाली भाजीभाकरे यांना देण्यात आला.
यावेळी खामगाव उपविभाग सचिव ठोसरे, तालुका अध्यक्ष बाठे, सुमित गवई, राहुल चौधरी, नागरे, गुंजकर, वानखेडे इत्यादी उपस्थित होते.