बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बँकिंग क्षेत्रातील काँग्रेसच्या ताईंचे राजकीय क्षेत्र..नंतर भाऊ पण बँकिंग क्षेत्रासह राजकीय क्षेत्रात उतरले! काँग्रेसच्या ताई आणि आता भाऊंनी प्रवेश घेतला उबाठा शिवसेनेत!भाऊ- ताईंनी स्पर्धा केल्या पेक्षा दोघांनी एकत्र लढल्यास आगामी बुलढाणा विधानसभेवर झेंडा फडकू शकतो!असे आम्ही म्हणत नाही तर ही जनभावना आहे.
बुलढाणा वन मिशनचे संदीप दादा लोकसभेत पराभूत झाले.त्यांच्यासोबत केवळ कर्मचाऱ्यांची फौज होती.कार्यकर्त्यांची नव्हे! त्यांनी आता शिवबंधन बांधले आहे.जयश्रीताई शेळके पण शिवसेनेच्या वाटेवर होत्या.ताई जवळ कार्यकर्त्यांची फौज आहे.परंतु त्या प्रबळ असल्याने त्यांना उबाठा कडून काही बुलढाण्यातील नेत्यांनी पद्धतशीर हटविले.असे असले तरी ताई काही कमी नाहीत.त्यांची पुढील भूमिका योग्यच राहील! दरम्यान
मातृतिर्थ राजमाता जिजाऊंच्या जिल्ह्यात महिलेला विधानसभेत उमेदवारीची संधी मिळणार का? असा प्रश्न भगिनी उपस्थित करीत आहेत. विशेष म्हणजे जयश्रीताई आणि संदीप दादांनी एकत्र येण्याची इच्छा मतदारसंघातील जनतेची आहे.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जर जयश्रीताई आणि संदीप दादा शेळके एकत्र झाले तर बुलढाणा मतदारसंघात त्यांना खूप मोठा फायदा होऊ शकतो असे जाणकार मत व्यक्त करीत आहेत.जयश्रीताईंचे कार्य आणि दादांचा संघर्ष म्हणजेच बुलढाणा विधानसभेचा निश्चित विजय होऊ शकतो.ताईंची वाढती लोकप्रियता आणि संदीप दादांचा जनसंपर्क याला पूरक ठरू शकतो.ताईंनी शेकडो महिलांना आजपर्यंत बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे.शैक्षणिक वारसा लाभलेले हे शेळके कुटुंब बुलढाणासाठी वरदान ठरू शकतात,मोठ्या कंपन्या बुलढाण्यात आणून एमआयडीसी तसेच इतरही विकास कामे खेचून आणू शकतात.सर्वच पक्ष स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारतात परंतु महिलांना संधी देण्याची वेळ आली तेव्हा वरिष्ठ नेते याला बगल देतात.जयश्रीताई यांची दिशा महिला बचत गट फेडरेशन जिल्ह्याभरात पसरलेली आहे. त्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगारसाठी बचत गटाच्या माध्यमातून मदतीचा हात दिला जात आहे. महिला आर्थिक सक्षम करण्याचे काम ताई अविरतपणे करीत जवळपास 50 हजाराहून अधिक महिला त्यांच्याशी जोडल्या गेल्या आहेत.तेव्हा भाऊ बहिणीने एकत्र येऊन विधानसभा काबीज करावी, असे मत जनता व्यक्त करीत आहे.