spot_img
spot_img

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 25 कोटीचे तडजोड शुल्क वसूल!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघसच्या वतीने शनिवार, दि. २७ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. जिल्ह्यात एकूण ५७ हजार २६४ प्रकरणे ठेवण्यात आली. यातील एकूण ७ हजार १५२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच एकूण २४ कोटी ९४ लाख ३६ हजार ४६७ रूपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.

लोकअदालतीमध्ये बॅंक, ग्रामपंचायत, नगर परिषद, तसेच वाहतूक शाखा, दूरसंचार निगम आणि विद्युत वितरण कंपनी यांचे दाखलपूर्व ४९ हजार ३७३ प्रकरणे दाखल झाले. यातील ६ हजार १६५ प्रकरणे निकाली निघाली आहेत. याचे तडजोड शुल्क २ कोटी ५८ लाख ५५ हजार २६१ रूपये वसूल करण्यात आले. तसेच न्यायालयातील ७ हजार ८९१ प्रलंबित प्रकरणे लोकअदालीतमध्ये ठेवण्यात आली. यातील १ हजार ७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात २२ कोटी ३५ लाख ८१ हजार २०६ रूपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा न्यायाधीश एस. एस. चंदगडे, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर डी. पी. काळे, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पी. डी. मेंढे यांचे पॅनल तयार करण्यात आले. सदर पॅनलवर अॅड. संदीप टेकाळे, अॅड. रत्नमाला गवई, अॅड. आर. एम. काशीकर यांनी सहाय्यक पंच म्हणून काम पाहिले.

लोकअदालतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नितीन पाटील, वरिष्ठ लिपीक व्ही. डी. बोरेकर, लेखापाल नितीन लांडे, कनिष्ठ लिपिक एस. एन. मुळे, जी. पी. मानमोडे, ए. बी. अवचार, मनिषा साखरे, अनुराधा खडसान, यशोदा अवचार, व्ही. एस. मिलके, पी. एल. खर्चे यांनी पुढाकार घेतला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!