देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) गिरोली खुर्द येथील श्रीकृष्ण व गोसंवर्धन ट्रस्ट मधून ७ गायी व एक गोरा अज्ञात चोरट्याने लंपास केल्याच्या पार्श्वभूमीवर ‘आता पशुधन कत्तलखान्याच्या मार्गावर’ अशी बातमी ‘ हॅलो बुलढाणा’वर उमटताच भारतीय जनता पक्षाने ठाणेदार संतोष महल्ले यांना या पशुधनाचा तात्काळ तपास करावा असे निवेदन दिले आहे.
गिरोली खुर्द येथील श्रीकृष्ण व गोसंवर्धन ट्रस्ट मधून ७ गायी व एक गोरा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. हे पशुधन कत्तलखानाकडे गेले असावे अशी शंका भारतीय जनता पक्षाने उपस्थित केली.या प्रकरणाचा तातडीने तपास करावा अशा मागणीची निवेदन ठाणेदारांना देण्यात आले आहे.निवेदनावर शहराध्यक्ष संजय तिडके,दादा , प्रवीण धंन्नावत,सचिन व्यास, मनीष अग्रवाल,निलेश वनवे, आदर्श ,आशिष भालेराव, महेश मुळे,गणेश , सुरज हनुमंते आदींची स्वाक्षरी आहे.