चांडोळ (हॅलो बुलढाणा/सलमान नसीम अत्तार) श्रावण महिन्याची सुरुवात ५ ऑगस्ट सोमवार पासून होत आहे. योगायोग म्हणजे तब्बल 71 वर्षाने एक दुर्मिळ योग आला आहे. श्रावण महिन्याची सुरुवात ही श्रावण सोमवारणे होणार आहे. आणि शेवट ही सोमवारणे होणार आहे.
महादेवाची आराधना रोज केली जाते. 12 महिन्यात महादेवाची आराधना करण्यासाठी श्रावण महिना सर्वोत्तम समजल्या जाते.श्रावण महिन्यात दर सोमवारी विशेष अभिषेक, पुजा केली जाते. तब्बल 71 वर्षानंतर दुर्मिळ योग आला आहे. श्रावणाची सुरुवात व शेवट सोमवारीच होणार आहे. 18 वर्षानंतर 5 सोमवार श्रावण महिन्यात आहे. पहिला सोमवार 5 ऑगस्ट , दुसरा सोमवार 12 ऑगस्ट , तिसरा सोमवार 19 ऑगस्ट,चौथा सोमवार 26 ऑगस्ट तर पाचवा सोमवार 2 सप्टेंबरला आहे.मागील वर्षी 2023 मध्ये अधिकचा मासामुळे दोन महिन्याचा श्रावण महिना होता.त्यामुळे गेल्या वर्षी 8 श्रावण सोमवार पडले होते.
▪️आराधनेचा काळ
श्रावण महिना हा हिंदूंच्या पवित्र चातुर्मांसापैकी एक मानला जातो.वर्षभर महादेवाची पूजा केल्याने जे फळ मिळते ते फक्त श्रावण महिन्यात पूजा केल्याने मिळते असे मानले जाते. या महिन्यात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची पुजा केली जाते. महादेवाला समर्पित असणारी वृत्तेची पुजा हयाच महिन्यात केली जाते.सोमवारी पूजा करतांना शिवलिंगावर पाणी आणि बेलाची पाने अर्पण केली जातात. याच श्रावण महिन्यात नागपंचमी,रक्षाबंधन,विनायक चतुर्थी,संकष्टी चतृर्थी,शीतल सप्तमी,दुर्गाष्टमी व कलाष्टमी असे सण-उत्सव आहेत तर हयाच महिन्यात श्रावणातील मंगळवारी ‘मंगळागौर ही साजरी करण्यात येणार आहे. तसेच हयाच महिन्यात मोठया प्रमाणावर महाप्रसादाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.