बुलढाणा (हॅलो बुलढाणा/राजेंद्र घोराडे) प्रशासकीय अधिकारी असलेले सिद्धार्थ खरात यांचा सेवा गौरव कार्यक्रम नुकताच बुलढाण्यामध्ये पार पडला.सेवा पूर्ण न करताच “स्वच्छ निवृत्ती” घेऊन, आपल्या प्रशासकीय कारकिर्दिला फुलस्टॉप देणारे जिल्ह्यातील हे तिसरे अधिकारी.
यापूर्वी उपजिल्हाधिकारी पदावरून श्री सुनील शेळके यांनी राजीनामा देऊन अभिता लँड सोलुशन्स नावाने जमिनीच्या खरेदी विक्री शी संबंधित व्यवसाय सुरु केला, वा अगोदरच सुरू केलेला व्यवसाय त्यांनी राजीनामा देऊन अधिक विकसित केला, वेगवेगळ्या व्यवसायामध्ये गुंतवलेला पैसा त्यांच्याकडे अधिक पटीने परत येत असावा त्यामुळे त्यांची अगदी कार्पोरेट स्टाईल लाइफस्टाइल पाहायला मिळते.राजर्षी शाहू, अभिता लँड सोल्युशन्स, अभिता फिल्म प्रोडक्शन,असे व इतर अनेक व्यवसायातून त्यांनी व्यावसायिक यश मिळवले असले तरी, राजकीय ताकदिची पुरेपूर जाणीव असलेल्या सुनील शेळके यांना अद्याप या राजकीय ताकदीची चव चाखायला मिळालेली नाही, तसे म्हणायला त्यांच्या पत्नी सौ जयश्रीताई शेळके या राष्ट्रीय काँग्रेसमधून व शिवसेना उभाठा ठाकरे गटात नुकतेच प्रवेशित त्यांचे बंधू संदीप शेळके हे पुढील विधानसभेच्या दृष्टीने तयारीत आहेत,व या सर्व बाबी सुनील शेळके यांच्या अपरोक्ष आहेत,असे मान्य करणे जरा कठीण आहे.एकाच वेळी आर्थिक,सामाजिक व राजकीय शक्ती आपल्या पदराला बांधण्यात श्री सुनील शेळके यशस्वी झालेत.
त्याचप्रमाणे माजी प्रशासकीय अधिकारी दिनेश गीते यांनीही उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा देऊन आपल्या राजकीय महत्वाकांक्षा जाहीर केल्या आहेत, व पुढील निवडणूक लढवण्याचा त्यांचा अंदाज ही आहे.आर्थिक क्षमता प्राप्त केल्यानंतर एकदम राजकीय उपरती झालेले गिते साहेब एका विशिष्ठ पक्षाचे कार्यक्रम टाळतांना दिसतात,त्यामुळे त्यांचा कल ओळखता येऊ शकतो.
शासनाच्या सेवेत सहसचिव पदावरुन स्वेच्छा निवृत्ती स्वीकारणारे सिध्दार्थ खरात यांनी राजीनामा दिल्यानंतर काल त्यांचा सेवागौरव कार्यक्रम बुलढाणा येथे घेण्यात आला,या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना श्री खरात हे देशात लोकशाही संस्था कमकुवत केल्या जात आहे तर महाराष्ट्राला नैतिक व सांस्कृतिक अधःपतनाकडे नेल्या जात आहे. शाश्वत विकासाऐवजी वेळकाढू, तकलादू योजनांची आखणी होत आहे,असे म्हणाले.त्यांचा रोख सद्य सरकारच्या कामावर होता,तरी राजकीय पावली खेळण्याची त्यांची महत्वकांक्षा लपून राहिली नाही.
अशाप्रकारे प्रशासकीय पदावर “योग्य” तो कालावधी घालवून,आपल्या सामाजिक कर्तव्यपूर्तिकरिता राजकारणात येण्याचा नवीन पायंडा हे अधिकारी घालून देत आहेत? की आपल्यापेक्षा बुद्धीने कमजोर लोकांच्या हाताखाली काम करून स्वतःची व स्वतःच्या “स्व” ची वाट लागतांना पाहणे अधिक यातनादायी आहे याची जाणीव झाल्याने या लोकांनी निवृत्ती चा पर्याय स्वीकारून,आता अप्रत्यक्ष काम करन्याऐवजी आता प्रत्यक्ष लोकशाहीत उतरायचे ठरवले आहे? की सत्तेची ताकद अनुभवली असल्याने “वजीर’ किंवा सेनापती,अथवा सैनिक म्हणून मरण्यापेक्षा “राजा” म्हणून जगण्याकरिता निवृत्ती अधिक राजकीय पटल अशा बेरजा आहेत?
बाकी काही असो,प्रशासकीय अधिकार्यांच्या राजकीय प्रवेशाला राजकीय लोक जेवढ्या हलक्यात घेत आहेत,याचा पच्छाताप लवकरच होताना दिसतो,की जनतारूपी दगडावर आदळून, अधिकारी लोक स्वतःचा “शरद पवार” करतात?,की “शाम पवार”? हे लवकरच पाहायला मिळेल.