साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा) पोलीस स्टेशन अंतर्गत शिंदी येथील प्रदीप शेषराव इंगळे २८ या युवकाने घरातच गळफास लावून आत्यहत्या . उपरोक्त घटना ही २८ जुलै रोजी सकाळी १० वाजता घडली.
फिर्यादी संदीप शेषराव इंगळे यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशन मध्ये तंक्रार दिली की मी शिंदी बसस्थानकावर उभा असताना माझा मुलगा ज्ञानेश्वर यांने सांगितले की काकाने लोखंडी ऍगलला दोर लावून आत्यहत्या केली . घरी जाऊन पाहतो तर प्रदीप हा लटकलेल्या अवस्थेत दिसून आला . साखरखेर्डा पोलीस स्टेशन मध्ये येऊन माहिती दिली असता पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे . प्रदीप शेषराव इंगळे हा शेतमजूर असून मजूरी करुन आपल्या कुटूंबाचा प्रपंच चालवीत असायचा . त्याने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र कळू शकले नाही त्याच्या मागे पत्नी , एक मुलगा , एक मुलगी असा परिवार आहे . पोलिस हेड कॉन्स्टेबल नितीन राजे जाधव यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिंदखेडराजा येथे पाठविण्यात आला आहे . पुढील तपास नितीन राजे जाधव करीत आहेत .














