बुलढाणा (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील मौजे सोयगाव ता.जि. बुलढाणा येथील स्मशानभूमीत शंकर महादेवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख श्री जालिंदर बुधवत यांच्या पुढाकाराने संपन्न झाले आहे.
सोयगाव या गावात श्री जालिंदर बुधवत यांनी अनेक विकासाची कामे केली आहे. आज 28 जुलै रोजी स्मशानभूमीत शंकर महादेवाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी पूजेचे आयोजन करण्यात आले होते. श्री जालिंदर बुधवत यांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून पूजा केली. तसेच त्यांनी स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण करत बसण्यासाठी बाकडे सुद्धा बसवली आहे.
या कार्यक्रमाला बुलडाणा पं. स. माजी सभापती सुधाकर आघाव, माजी समाधान बुधवत, उदयभान तायडे, ग्राम पं. स. पवन बुधवत, कौतिकराव वासे , सदाशिव बुधवत, गणेश तायडे, गणेश बुधवत, अंबादास कदम, बाबुराव बुधवत, राजाराम बुधावत, शेषराव बुधवत, प्रमोद बुधवत, बाळासाहेब सिनकर , गणेश तायडे, विष्णू बुधवत डी एल, विष्णू बुधवत, दीपक दराडे, आकाश मांटे, सुधाकर मुंढे, गणेश बुधवत, शेषराव बुधवत, अनिल बुधवत, गोपाल तायडे, पंजाबराव महाले, यांच्यासह सोयगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.