बुलढाणा (हॅलो बुलढाणा) समृद्धी महामार्ग अपघातांसाठी कूप्रसिद्ध आहे. याच समृद्धी वरील दुसरबिड मार्गात पेट्रोल पंपा जवळ रात्री 10 च्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मोठमोठे दगड लावून रस्ता बंद केला होता. दरम्यान वसीम शेख हे आपल्या कुटुंबासह चार चाकी वाहनाने इथून जात असताना, त्यांची गाडी दगडाला धडकल्याने टायर फुटला. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. परंतु या मार्गात मोठमोठे दगड कोणी ठेवले हा प्रश्न महत्वाचा आहे. शिवाय वसीम शेख यांनी शासन प्रशासना विरोधात रोष व्यक्त करीत 5 कोटीचा दावा करणार असल्याचे म्हटले आहे.
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असते. ज्यांनी ‘मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक..’ लावला ते वाचले आणि या उलट ‘जे वेगाने गेले ते देवाघरी गेले..’ असा समृद्धीवरचा अनुभव आहे. तसा हा महामार्ग अवैध रहदारी, चोरट्यांचा अड्डा बनल्याचे दिसून येत आहे. दरम्यान समृद्धी महामार्गावरून वसीम शेख दोन मुली एक मुलगा आणि बायकोसह जात असताना दुसबीड मार्गात पेट्रोल पंपा जवळ अज्ञात कुणीतरी मोठमोठे दगड ठेवून रस्ता बंद केल्याने वसीम शेख यांची गाडी दगडावर धडकली. सुदैवाने जीवित हानी झाली नाही परंतु त्यांच्या गाडीचा टायर फुटला असून नुकसान झाले आहे. जर जीवित हानी झाली असती तर याची जबाबदारी कोणी घेतली असती असा प्रश्न उपस्थित करत,यंत्रणेने या अपघाता प्रकरणी मला 5 कोटी रुपयांचा मोबदला देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.