spot_img
spot_img

लाखोंच्या नुकसान भरपाईची रक्कम भिकाजीने गिळली!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) अरून महादेव दांडगे व इतर अशा एकूण 14 जणांची नुकसान भरपाईची लाखोंची रक्कम गिळंकृत करून आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार जळगाव जामोद पोलिसांकडे दाखल झाली आहे.

अरून महादेव दांडगे यांचे नातेवाईक भिकाजी गोविंद दांडगे यांनी 7 ते 8 महिन्यापूर्वी मागच्या वर्षी 22 जुलै 2023 च्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शासना कडून मिळवून देतो असे सांगीतले होते. दरम्यान 14 जणांच्या घरामध्ये महापूराच्या पाण्यामुळे अतोनात नुकसान झालेले होते. त्यामुळे सर्वांनी वासूदेव झुराजी दांडगे यांच्या घरामध्ये बसून भिकाजी गोविंद दांडगे यांच्याकडे
आधार कार्ड आणि बँकेचे पासबूक झेरॉक्स आदी कागदपत्रे दिली. त्या नंतर जवळपास फेब्रुवारी 2024 मध्ये सर्वांच्या खात्यावर जवळपास 80 हजार ते 1 लाख पर्यंत रक्कम जमा झाली.
मिळालेली रक्कम अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात आल्यामुळे सर्वांनी श्री भिकाजी गोविंद दांडगे यांचेकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी तलाठी यांच्याकडून चुकून तुमच्या खात्यावर
जास्त रक्कम टाकल्या गेली व तुम्ही 20 टक्के रक्कम त ठेवून उर्वरीत 80 टक्के रक्कम परत
द्या’ असे सांगीतले. दरम्यान सर्वांनी खात्यामधून नगदी स्वरूपात व काहींनी ऑनलाईनव्दारे व काहींनी श्री भिकाजी दांडगे यांची सून सौ. लता वसंता दांडगे यांच्या खात्यात रक्कम बँकेमधून
ट्रान्सफर केली. त्यामध्ये नगदी स्वरूपात काहींनी त्यांचे घरी व काहींचे पैसे घेण्यासाठी त्यांचा मुलगा
अशोक व वसंता आणि त्यांचा नातू वैभव हे पैसे घेण्या करीता वारंवार तगादा लावत. त्यामुळे सर्वांचे 80 टक्के रक्कम ही श्री भिकाजी दांडगे यांना दिली.सर्वांना 12 जूलै 2024 रोजी मा. तहसिलदार जळगांव जामोद यांचे कडून सदरहू पैसे भरण्या बाबत नोटीस आल्या त्यामुळे श्री भिकाजी दांडगे व त्यांची मूले यांना याबाबत चौकशी केली असता ‘ते पैसे तुम्ही आमच्याकडे दिलेच नसल्याचे तसेच काही वेळेस ते पैसे आम्ही आमच्या
कडे न ठेवता तलाठी यांना दिल्याचे सांगत आहेत.’ असे उडवा उडविचे उत्तरे श्री भिकाजी व त्यांची मुले देत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!