spot_img
spot_img

अखेर चिमुकल्या वाघाने प्राण सोडला! -‘हॅलो बुलढाणा’ च्या बातमीने मिळाली होती दोन लाखांची उपचारासाठी मदत..

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/ संतोष जाधव) निरागस किडनीग्रस्त बालक तडफडत होता. त्याला साडेचार लाख रुपयांची उपचारासाठी गरज होती. ‘हॅलो बुलढाणा’ने मदतीची बातमी प्रसारित केल्याने देणाऱ्यांचे हात पुढे येऊ लागले. परंतु उपचारादरम्यान या चिमुकल्याची प्राणज्योत मालवली आहे.

देऊळगाव माही येथील रहवाशी 8 वर्षीय साई भगवान वाघ याला बालवयातचं किडनी आजाराने घेरले होते. किडनीग्रस्त आजाराने तो
चांगलाच त्रस्त होता. साई या आजारातून बरा व्हावा म्हणून गेल्या अनेक
महिन्यासापासून त्याचे आई वडील उपचारासाठी बऱ्याच हॉस्पिटलचे उंबरे पार करित छत्रपती संभाजीनगर सारख्या
ठिकाणी त्याच्यावर उपचार करित होते. परंतु
विविध उपचारा दरम्यान साई ची एक किडनी निकामी झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. साईच्या पुढील उपचारासाठी साडेचार लाख रुपयांची गरज होती. एवढे पैसे मोलमजुरी करणाऱ्या साईच्या आई-वडिलांकडे नव्हते. दरम्यान ‘हॅलो बुलढाणा’ने साईच्या मदतीसाठी बातमी प्रकाशित केली होती. परिणामी या बातमीने दोन लाख रुपये त्यांच्याकडे पोहोचते झाले. साई साठी इतर दानवीरांनी ही मदत केली. परंतु उपचारादरम्यान साईचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!