बुलढाणा (हॅलो बुलढाणा) कारगिल विजय दिनानिमित्त आज भाजप युवा मोर्चाने काढलेली मशाल रॅली देशप्रेम जागवून गेली.
२६,जुलै,१९९९ रोजी कारगिल युद्धात आपल्या जवानांनी पाकिस्तानवर विजय मिळविला होता. तेव्हापासून २६,जुलै हा दिवस “कारगिल विजय दिन” म्हणून आपण साजरा करीत असतो. यावर्षी २६,जुलै रोजी कारगिल विजयाला २५ वर्ष पूर्ण होत आहे.
त्यानिमीत्ताने जिल्हाध्यक्ष डॉ.गणेशजी मांटे, जिल्हा प्रभारी शिवराज जाधव व रामजी मिश्रा यांच्या निर्देशानुसार आणि भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विनायकजी भाग्यवंत यांच्या नेतृत्वात भाजपा युवा मोर्चाच्या वतीने बुलढाणा येथे मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर मशाल रॅलीची कारंजा चौक येथुन सुरुवात होऊन हुतात्मा गोरे स्मारक येथे सांगता करण्यात आली. या प्रसंगी विश्राम पवार सर, सौ.स्मिताताई चेकेटकर यांनी कारगिल विजयी दिनाचे महत्त्व समजून सांगितले. तसेच सुभेदार अनिल डोंगरदिवे यांनी त्यांचे अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजि वैभव लाड यांनी केले .
यावेळी सुभेदार सुरेश खंडारे, सुभेदार गुलाब मिसाळ, सुभेदार मदन बीबे, सुभेदार मधुकर खरे, सुभेदार शंकर हिवाळे, सुभेदार सिद्धार्थ मिसाळ हे आज-माजी भारतीय सैनिक तसेच मंदार बाहेकर, अरविंद होंडे, सौ.सिंधुताई खेडेकर, सौ.रंजनाताई पवार आदी उपस्थित होते.