spot_img
spot_img

राष्ट्रीय समाज पक्षाचा बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख करत होता अवैध देशी दारू विक्री! -राज्य उत्पादन शुल्कची धडक कारवाई

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून ओळखला जाणारा पक्ष म्हणजे महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष आता याच पक्षाच्या बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुखाचा प्रताप बघून तुम्हाला धक्काच बसेल! तर होय तुम्ही वर जे वाचले ते खरे आहे सिंदखेड राजा तालुक्यातील बारलिंगा या गावात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री सुरू होती दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर होते आणि दारू विक्री करणारा होता राष्ट्रीय समाज पक्षाचा जिल्हा संपर्कप्रमुख गावातील प्रतिष्ठित मंडळींनी एकत्र येऊन त्याला दारू विक्री बंद करण्याची विनंती देखील केली होती पण राजकीय वरदहस्त असल्या कारणाने पोलीस देखील लक्ष द्यायला तयार पण गावचे तंटामुक्ती अध्यक्ष राजू नागरे यांना गावातील ९० टक्के भांडण हे दारूमुळे होत असल्याने त्यांनी आक्रमक पवित्राच घेतला गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे तक्रार करून त्यांना पाचारण करण्यात आले राज्य उत्पादन शुल्क बुलढाणा यांनी अतुल भुसारी याच्या घरी धाड टाकत एकूण ३३६०/- रुपये किमतीचा ८.६४ लिटर दारू साठा जप्त ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क कार्यालय चिखली येथील निरीक्षक रा.ने.रोकडे यांच्या नेतृत्वात एस.बी. रोटे, सहा-दुय्यम निरीक्षक जी. व्हि .पहाडे, जवान ए.पी तीवाने जवान एस.डि. जाधव यांनी केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!