बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ग्रामीण भागातही बीएसएनएलची मोबाईल आणि इंटरनेट सेवा ग्राहकांना उत्तमरीत्या मिळावी या दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी नवीन टॉवरची मागणी केली होती त्यानुसार जिल्ह्यात आता 8 नविन टॉवर उभारल्या जाणार आहे
बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात भारतीय दूरसंचार निगम अर्थात बीएसएनएलची सेवा मिळत नाही अशा तक्रारी ग्रामीण भागातून
केंद्रीयमंत्री तथा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या यासंदर्भात दूरसंचार विभागाशी पत्र व्यवहार करून सूचित करण्यात आले होता बीएसएनएलची इंटरनेट व मोबाईल सेवा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून नवीन टॉवर उभारण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले होते नवीन टॉवरचा प्रस्ताव तयार करून तो संबंधित विभागाला पाठवल्यानंतर त्याचा पाठपुरावा खासदार प्रतापराव जाधव यांच्या कार्यालयाच्या वतीने करण्यात आला होता त्याच्या पाठपुराव्याला यश आले असून बुलढाणा जिल्ह्यात आता नवीन आठ टॉवर ग्रामीण भागामध्ये उभारल्या जाणार आहे यामध्ये बुलढाणा तालुक्यातील दहिद खुर्द , पळसखेड नाईक , मेहकर तालुक्यातील करतवाडी , चिंचाळा सिंदखेडराजा तालुक्यातील वाकड जहागीर जळगाव जामोद तालुक्यातील पळशी वैदय , लोणार तालुक्यातील मढी आणि चिखली तालुक्यातील चंदनपूर येथे हे बीएसएनएलचे टॉवर उभारल्या जाणार आहेत या टॉवरमुळे इंटरनेट आणि मोबाईलची बीएसएनएल सेवा सुधारून नेटवर्कही ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.