बुलढाणा (हॅलो बुलढाणा) विधानसभेचे वेध लागल्याने इच्छुक उमेदवार तिकीट मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. शिवाय आमच्याच पक्षाला जागा सोडण्यात यावी, हा हट्टही पक्षश्रेष्ठींकडे व प्रसारमाध्यमांसमोर करीत आहेत.
मेहकर मतदान संघामध्ये काँग्रेस पक्षाचे बलाबल आहे. मतदार संघातील प्रत्येक गावात काँग्रेस पक्षाची फळी तयार आहे. प्रत्येक निवडणुकी मध्ये काँग्रेस पक्षाने नेहमी जीव ओतून पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कामे केली. मतदार संघात काही जिल्हापरिषद सर्कल काही पंचायत समिती सर्कल,नगर परिषद ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस तुल्यबळ आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मेहकर मतदारसंघ कांग्रेसला सोडण्यासाठी पक्षश्रेष्ठीकडे मागणी केली असल्याची माहिती अथर्व हॉटेल येथील आयोजित पत्रकार परीषदमध्ये काँग्रेस तालुका अध्यक्ष राजेश मापारी यांनी दिली.
यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष राजेश मापारी, शहर अध्यक्ष शेख समद शेख अहमद,काँग्रेस जेष्ठ नेते प्रकाश धुमाळ, माजी पंचायत समिती सभापती झानेश्वर चिभडे, ओ बी सी सेल जिल्हा अध्यक्ष प्रा.गजानन मापारी, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष बादशाह खान पठाण, मा. नगरपरिषद अध्यक्ष भूषण पाटील मापारी, युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अनिकेत मापारी, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष तोफिक कुरेशी माजी नगरसेवक शेख रुउफ शेख महेबूब आदी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.