बुलढाणा (हॅलो बुलढाणा) निरागस चेहऱ्यावर हसू कसे आणायचे? या साठी धडपडणारे आमदार संजय गायकवाड यांनी एका मुला मुलींच्या वस्तीगृहाला जागेसह 3 कोटी रुपयांच्या निधीची मान्यता मिळवून दिली आहे. दरम्यान संबंधितांनी गायकवाड यांचे आभार मानून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
मराठा सेवा संघाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या मुलामुलींच्या वसतीगृहासाठी आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी नगरपरिषदेच्या मालकीची 0.89 आर जागेसह रु.3.00 कोटींचा निधी महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करून घेतला असून तसा शासन निर्णय 23 जुलै 2024 रोजी प्राप्त झाला आहे. सदर निर्णयामुळे बहुजन समाजातील सर्व गरजु पाल्यांना फायदा होणार आहे. या शासन निर्णयाची प्रत देतांना आमदार संजूभाऊ
गायकवाड व उपस्थित मराठा सेवा संघाचे पदाधिकारी डॉ मनोहर तुपकर राज्यसहसचिव, रवी काळवाघे, इंजि, कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ बुलडाणा, डॉ. अशोकराव खरात, जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकार कक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिमस बँक बुलडाणा, डॉ दिवाकर काळे, दत्तात्रय शेळके इंजि., डॉ. पाचरणे, डॉ.गजानन जाधव, डॉ. आर एस. पाटील,अरुण चव्हाण, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी जिमस बँक बुलडाणा, सोमीनाथ इथापे जिमस बँक बुलडाणा, मनिष ठाकरे जिमस बँक बुलडाणा, दीपक गायकवाड, जिमस बँक बुलडाणा, गणेश रहाटे जिमस बँक बुलडाणा, समाधान कापसे, जिमस बँक बुलडाणा, दत्तात्रय भोंडे, अमोल पवार,इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.