spot_img
spot_img

धडक-बेधडक! -एक ठार एक जखमी! -कुठे धडकल्या समोरासमोर दुचाक्या?

साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा/ दर्शन गवई)
सुसाट वाहनांना ब्रेक कोण लावणार? असा प्रश्न अपघातांच्या संख्येवरून उपस्थित होत आहे. साखरखेर्डा पोलिस स्टेशन अंतर्गत चिखली ते मेहकर रोडवर पिंपळगाव काळे फाट्याजवळ दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात हिवरा आश्रम येथील उमेश अप्पा खेमेकर वय ४५ वर्ष यांचा मृत्यू झाला आहे तर एक जखमी झाला आहे.

उपरोक्त घटना ही २४ जुलै रोजी सायंकाळी सात वाजता घडली.
हिवरा आश्रम येथील उमेश अप्पा गणेश अप्पा खेमेकर हे चिखली येथून हिवरा आश्रम येथे येत असताना विरुद्ध दिशेने अमोल समाधान ढव्हळे हे मेहकर येथून आमखेडला जात होते . या दोघांच्या मोटारसायकलची समोरासमोर धडक झाल्याने हिवरा आश्रम येथील उमेश अप्पा गणेश अप्पा खेमेकर हेअपघातात गंभिर जखमी झाले. त्यांना तातडीने मेहकर येथील रुग्णालयात दाखल केले असता, उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले तर अमोल समाधान ढव्हळे हे जखमी झाले आहेत. साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल स्वप्निल डोईफोडे,पो काॅ. इनामे यांनी घटणास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. अद्याप तक्रार दाखल झाली नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!