बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आदेश आला मग काय? तत्पूर्वीच फिल्डिंग सुरू झाली असावी.. असा आरोप होत आहे. बुलढाणा पोलीस दलात पदस्थांसह 12 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना बदलीने पदस्थापना देण्याबाबत 23 जुलै रोजी निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कडे अनेकांनी जुगाड टेक्नॉलॉजी वापरल्याचे बोलले जात आहे.
त्याचे कारणही तसेच असावे..स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) ही पोलिस प्रशासनाचे डोळे आणि कान समजली जाते. परंतु, अलिकडच्या काही घडामोडींमुळे डिटेक्शन आणि कलेक्शन अशी रूढ केली जाणारी व्याख्या बदलण्याचे आव्हान एसपी सुनील कडासने यांच्यापुढे आहे.
हे पण खरे आहे की,या शाखेने गंभीर गुन्ह्यांचा छडा लावत नावलौकिक मिळविला आहे. गुन्हेगारांना शोधणे आणि प्रलंबीत गुन्ह्यांचा छडा लावणे ही ‘एलसीबी’ची कार्यप्रणाली आहे. खबऱ्यांचे नेटवर्क आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने तपासात ‘एलसीबी’ आघाडीवर असते. जिल्हा कार्यक्षेत्र असल्याने पोलिस ठाण्यांसोबत महत्त्वाच्या गुन्ह्यात ‘एलसीबी’ समांतर तपास करते. ‘नेक्स टू एसपी’ अशा विशेष ओळखीमुळे ‘एलसीबी’ला पोलिस दलात मानाचे स्थान असते. या शाखेचे कर्मचारी, अधिकारी हुशार आणि कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तल्लख असतात, असे मानले जाते. या शाखेत प्रतिवर्षी नियुक्तीसाठी अनेकांचे विनंती अर्ज येत असतात, तर एलसीबीतून बदली होऊ नये म्हणून कार्यरत अनेकांकडून प्रयत्न सुरू असतात. या शाखेतील बाह्य हस्तक्षेपाचा मुद्दा सध्या चिंतेचा विषय ठरतो आहे.
▪️ एलसीबीत 4 जणांना नव्याने पदस्थापना!
या आधीच 4 अधिकाऱ्यांची गुन्हे अन्वेषण विभागात भर पडली. 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक व एक पोलीस उपनिरीक्षकास नव्याने या ठिकाणी पदस्थापना देण्यात आली आहे.
▪️ कोण कुठे?
पोलीस दलातील दोन पोलीस उपनिरीक्षक व 12 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना बदलीने पदस्थापना देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
त्यामध्ये पोलीस नियंत्रण कक्ष (बुलढाणा) चे अनिल भुसारी यांना जिल्हा वाहतूक शाखा स्थानिक गुन्हे शक्करगे यांना स्थानिक गुन्हे शाखा पोलीस नियंत्रण कक्ष (बुलढाणा)
शहर माया चाटसे यांना बुलढाणा शहर,गणशे इंगाले यांना लोणार, गजानन करेवाड यांना मलकापूर शहर, बालाजी शेगेपल्लू यांना
बोराखेडी, शरद माळी यांना बुलढाणा ग्रामीण, तुषार जाधव यांना खामगाव शहर, स्वप्नील
तायडे यांना चिखली, नागेश मोहोड जळगाव जामोद, रुपेश (बुलढाणा), तर बुलढाणा पोलीस स्टेशनचे कं.सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग राजपुत यांना स्थानिक गुन्हे शाखा(बुलढाणा), मलकापूर शहरचे ईश्वर वर्गे यांना स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा अशी
बदलीने पदस्थापना देण्यात आली आहे.