बुलढाणा (हॅलो बुलढाणा) स्पर्धेच्या काळात आवडीचे करिअर क्षेत्र निवडा, अशी मार्गदर्शक सूचना कृष्णासिंग ठाकुर (आय.आय.आय.टी,नागपुर) यांनी विद्यार्थ्यांना केली.स्थानिक केंब्रीज स्कूल येथे वर्ग ९ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेच्या युगातील मोठे आव्हान करिअर निवड व प्रवेश संदर्भात २४ जुलै रोजी करिअर निवड व मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी कृष्णासिंग ठाकुर (आय.आय.आय.टी,
नागपुर) विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आय.आय.टी, इस्त्रो, डी.आर.डी. ओ हॉटेल मॅनेजमेन्ट,विविध
स्पर्धा परिक्षा इत्यादी विषयी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे व्यवस्थापन या विषयी
बहुमोल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शाळेचे प्राचार्य मुकेश जगताप यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांना तोंड
देण्यासाठी अवांतर वाचन, कामावर लक्ष व सकारात्मक विचार अंगी बाणावे असा संदेश दिला. याप्रसंगी प्राचार्य मुकेश जगताप, प्रमुख अतिथी कृष्णसिंग ठाकुर,
पी.आर.ओ चंद्रहास पिसे, डॉ. गणेश पाटील, देवेद्र मालविय यांची उपस्थिती होती. संचालन विज्ञान शिक्षिका रुचा सपकाळ यांनी केले.