धाड (हॅलो बुलढाणा/सय्यद सलमान सय्यद नसीम) अरबी मदरसेत जाणाऱ्यांना व शाळेत जाताना विद्यार्थ्यांना चिखल तुडवावा लागत होता. या रस्त्याची गटारगंगा झाली होती.
या संदर्भातील बातमी ‘हॅलो बुलढाणा’ ने नुकतीच प्रसारित केली. यंत्रणेची झोप उघडायची आहे.परंतु धाड येथील समाज सुधारक खालिद खा साहब यांनी स्वखर्चाने रोडवर व नूर मस्जिद परिसर मध्ये मुरूम टाकून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
पावसाळ्याच्या दिवसात येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने नागरिक व विद्यार्थी कंटाळले होते. ग्रामपंचायतने मात्र साधा मुरूम टाकण्याचेही कर्तव्य पार पाडले नाही.
अरबी मदरसेत जाणाऱ्यांना व शाळेत जाताना विद्यार्थ्यांना चिखल तुडवावा लागत असल्याने व येथील अपघाताची शक्यता लक्षात घेता, ही समस्या ‘हॅलो बुलढाणा’ ने उजागर केली होती. दरम्यान समाजसेवक खालिद खा साहब यांनी स्वखर्चाने सदर परिसरात मुरूम टाकल्याने हा मार्ग काहीसा सुकर झाला आहे. त्यामुळे खालिद खा साहब यांच्यासोबतच ‘हॅलो बुलढाणा चे सर्व ग्रामस्थांनी आभार मानले.