साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा) साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत 3 कीमी अंतरावरील गुंज माथा शिवारात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या संदर्भात पोलीस तपास करीत आहेत.
साखरखेर्डा मंडळात गुंज माथा हे उजाड गाव असून या शिवारात सवडद ,साखरखेर्डा, गुंज येथील शेतकऱ्यांची शेती आहे. साखरखेर्डा ते जानेफळ असा इंग्रज कालीन डाक रस्त्यावर सवडद येथील राजू अंभोरे यांची शेती आहे. तेथून एक नाला जातो, त्या नाल्यात 60 वर्षीय महिलेचा मृतदेहआढळून आला. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.