बुलढाणा (हॅलो बुलढाणा) नागराज मंजुळे यांचा ‘बापल्योक’ चित्रपट अजून प्रदर्शित झाला नाही. काय स्टोरी असेल ते सुद्धा माहित नाही. परंतु या चित्रपटातील एक गाणे प्रत्येकांच्या ओठावर रुंजी घालत आहे.’लयी अवघड आहे गड्या उमगया बाप रं!’ हे गीताचे बोल प्रत्येक मुलाला कळण्याची गरज आहे. कुणाल गायकवाड मात्र हे बोल जाणून आहेत. एकीकडे आ. संजय गायकवाड बुलढाणा विधानसभेला ‘अच्छे दिन’ आणण्यात व्यस्त आहेत तर दुसरीकडे त्यांचे पुत्र कुणाल गायकवाड सांत्वन भेटी देऊन दुःखीतांची असावें पुसत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मॅरेथॉन बैठकीत आमदार गायकवाड यांनी आज बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील ‘ड्रीम प्रोजेक्टला मान्यता’ मिळवून आणली. त्यामुळे बुलडाणा शहर हद्दवाढीसह, टेक्स्टाईल पार्क,फूडपार्कसह हरमोड धरणाची उंची वाढविणे. मलकापूर सोलापूर बायपास विषय मार्गी लागणार आहे. दरम्यान आमदारपूत्र कुणाल गायकवाड यांनी आज मोताळा तालुक्यातील विविध ठिकाणी सांत्वनभेट घेतली. वडिलांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते कुणाल गायकवाड यांनी सांत्वनपर भेटी देऊन दुःखद कुटुंबीयांचे सांत्वन केले. मोताळा तालुक्यातील ग्राम.थड येथे स्वर्गीय शिवराम धनवटे,ग्राम.पान्हेरा येथे स्व. कमलबाई मेमाणे तसेच स्व ल. तुळशीराम शर्मा, धामणगाव बढे येथे स्वर्गीय दामोदर जाधव तसेच स्वर्गीय रुक्मिणीबाई घोंगडे,
ग्राम रिधोरा खंडोपंत स्वर्गीय कुणाल कानडजे,
यांचे दुःखद निधन झाले होते. त्या निमित्ताने सांत्वनपर भेट घेतली. त्यांना धीर दिला. एकीकडे विकासावर लक्ष आणि दुसरीकडे आसवे पुसण्याचे काम पिता-पूत्र करीत आहेत.