3 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

आनंद वार्ता! ड्रीम प्रोजेक्टला मान्यता! – आ संजूभाऊ गायकवाड यांच्या प्रयत्नाला यश! -बुलडाणा शहर हद्दवाढीसह, टेक्स्टाईल पार्क,फूडपार्कसह हरमोड धरणाची उंची वाढविणे. मलकापूर सोलापूर बायपास विषयाला मान्यता!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या प्रयत्नाने बुलढाणा येथील विविध लोकहिताचे कामे तातडीने मार्गी लावण्याची आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आज दिले.

यात प्रामुख्याने बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील ड्रीम प्रोजेक्ट असलेले मोताळा येथील टेक्सटाईल पार्क तसेच बुलढाणा येथील फूडपार्कयासह हरमोड धरणाची उंची वाढविणे गिरडा ते कोलवड येथे १७ बांध तयार करणे,मलकापूर सोलापूर ७२ किलोमीटरचा रस्ता,राजूर घाटातील एकेरी वाहतूक आदी विषयास अंतिम मान्यता देण्यात आली.
या विषयी आज सह्याद्री अधिग्रह या ठिकाणी मतदारसंघातील विविध विकासाच्या मुद्द्यांना चालना देण्यासाठी सर्व प्रधान सचिव व मुख्याधिकाऱ्यांच्या बैठकी आयोजित करण्यात आली होती यावेळी पलढग धरणाचे ओव्हरप्लोचे ६०% पाणी कोथळी मार्ग नळगंगा धरणात वळती करणे व सांडव्यामध्ये बांध बांधून लिफ्ट मार्ग ४०% पाणी धामणगाव देशमुखच्या धरणात नेणे या विषयास मंजूरी देण्यात आली,सदर विषयामुळे जवळपास १२०० एकर जमिनीचे सिंचनक्षेत्र वाढणार आहे तसेच नळगंगा धरणाचे स्टोरेज वाढवणार आहे बुलढाणा तालुक्यातील गिरडा स्टोरेज डॅम साठवण तलाव,गिरडा ते कोलवड नदीवर जवळपास १७ बांध निर्मितीस मान्यता देण्यात आली,नळगंगा धरण हे मोताळा तालुक्यात आहे या पाण्याचा फायदा मात्र पुढच्या लोकांना होत होता परिणामी मोताळाच्या जनतेमध्ये नाराजी होती,गावात धरण असून पाण्याचा लाभ होत नसल्याने परिसरातील नागरिकांनी आमदार धर्मवीर श्री संजय गायकवाड यांची भेट घेऊन सदर विषय मार्गी लावण्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने आमदार धर्मवीर श्री संजय गायकवाड यांनी सदर विषय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
मोताळा तालुक्यातील किन्होळा शिवारामध्ये शासनाचे ई-क्लास १८५ हेक्टर जागेवर नळगंगा धरणातून पाणी लिफ्ट करून साठवून तलावाची निर्मिती करण्याच्या प्रस्तावाला देखील मान्य देण्यात आली आहे त्यामुळे धामणगाव बढे हनवातखेड व जवळच्या १७ गावांच्या शेतीचा सिंचनाचा प्रश्न कायमचा संपणार आहे.
उबाळखेड तालुका मोताळा येथे मोहाडी शिवारात नवीन धरणाच्या निर्मिती ही मान्यता देण्यात आली…!
या सोबतच मलकापूर-सोलापूर नॅशनल हायवे क्रमांक- ५३ हा रस्ता ७२ किमीचा बुलढाणा ते चिखली रस्ता बायपास करून बुलढाणा शहराच्या बाह्यवळण रस्ता व राजुर घाटातील एकेरी वाहतुकीसह चारपदरी रस्त्यास अंतिम मान्यता देण्यात आली..!मोताळा तालुक्यातील टेक्सटाईलपार्क व बुलढाणा तालुक्यातील फूडपार्क या ड्रीम प्रोजेक्ट ला शासनाने मान्यता दिल्याने लवकरच विधानसभेअंतर्गत अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहे..!यासह बुलढाणा शहरातील स्टेट बँक समोरील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या पडीक जागेत ६० टक्के जागा उद्यान व चौपाटी करिता मान्यता देण्यात आली…!आहे चिखली रोडवरील त्रिशरण चौकातील शासकीय अध्यापक महाविद्यालयाची २.५० एकर जागा नगरपालिकेची इमारत करिता देण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला..!
भूविकास बँकेची २० गुंठे जागा नगरपालिकेला छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग कॉम्प्लेक्स व सभागृह करीता देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला..! त्याचप्रमाणे मोताळा तालुक्यातील टेक्सटाईल पार्क व बुलढाणा येळगाव धरणाखाली १४ एकर जागा फूड पार्कला देण्याबाबतच्या वापरात बदलाच्या आदेशालाही संमती देण्यात आले १९९५ पासून नगरपालिकेच्या हद्द वाढीचा प्रस्ताव शासनाकडे पडून होता २००४ ग्रामविकास विभागाच्या एका शासन निर्णयामुळे ही हद्दवाढ करणे शक्य नाही असे महाराष्ट्र निवडणूक विभागाच्यावतीने सांगण्यात आले होते…!
शासन निर्णयाची अट येत्या आठ दिवसात शिथिल करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाला दिले..! आहे सदरची बैठक बुलढाणाचे आमदार धर्मवीर श्री संजय गायकवाड यांच्या विनंतीवरून बोलावण्यात आली होती..!
या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री,  सहकार मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे -पाटील, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार संजय गायकवाड, आमदार श्र्वेता महाले, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील  सर्व विभागाचे मुख्याभियंता सर्व चीफ इंजिनियर अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता उपस्थित होते त्या सर्वांसमोर आमदार धर्मवीर श्री संजय गायकवाड यांनी १५ विषयात प्रभावीपणे मांडणी केली,त्यावर मान्यता देण्यात आली…!
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार धर्मवीर श्री संजय गायकवाड हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील लोकहिताची विविधकामे अतिशय वेगाने मार्गी लावण्याचा सपाटा सुरू केला आहे..!
लवकरच आचारसंहिता जाहीर होण्याची चिन्हे आहेत त्या पार्श्वभूमीवर आमदार धर्मवीर श्री संजय गायकवाड हे दिवस-रात्र परिश्रम करीत असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातत्याने संपर्कात आहेत. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामे यांची माहिती देऊन कामे मंजूर करून घेत आहेत नुकतेच त्यांनी बुलढाणा विधानसभेतील मोताळा येथील ड्रीम प्रोजेक्ट असलेले टेक्सटाईल पार्क तसेच बुलढाणा येथील फूड पार्क या प्रोजेक्टला शासनाची मान्यता मिळून घेतली आहे या दोन्ही प्रोजेक्टमुळे जिल्हाभरातील हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे तसेच लघु व्यवसायिकांची सुद्धा चांगली दिवसे येणार आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!