बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सागवन समता नगर परिसर येथील निलेश डुकरे या केबल ऑपरेटरने आत्महत्या केल्याप्रकरणी लिहून ठेवलेल्या चिठ्ठी मध्ये असलेल्या 3 आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मनोज चंदन रा सुंदरखेड बुलडाणा,अनिल बाबुराव जाधव, रा जुना अजिसपुर,रोड सागवन, बुलडाणा, विलास चिंचोले रा. बुलडाणा अशी आरोपींची नावे आहेत.
धनंजय दत्तु डुकरे यांनी पोलिसांना फिर्याद दिली की, माझा मोठा भाऊ नामे श्री. निलेश दत्तात्रय डुकरे वय 42 वर्षे हा BCCN केबल नेटवर्कचे काम करत होता.त्याचे लग्न झाले आहे. 20 जुलै रोजी रात्री 11.30 वा दरम्यान माझा भाउ निलेश दत्तात्रय डुकरे वय 42 वर्षे हा गावामधुन घरी आला तेव्हा माझी आइ उषाबाई दत्तु डुकरे हीने विचारले की, तु येवढ्या उशीरा घरी का आला तेव्हा त्याने माझे आइला सांगीतले की, मनोज चंदन रा. सुंदरखेड बुलडाणा,अनिल बाबुराव जाधव, रा. जुना अजिसपुर रोड सागवन एरीया बुलडाणा यांचे सोबत होतो. तेव्हा माझे आइने विचारले की, तु त्यांचे सोबत गावामध्ये काय करीत होता, तर तो म्हणाला की, सध्या मानसीक स्थिती बरोबर नाही.या बाबत मी सकाळी सर्वांना सांगतो, मला जेवन करु द्या, दरम्यान 21 जुलैला सकाळी 07.30 वा.सर्व घरातील सदस्य उठलो व चहा पाणी घेतला त्यानंतर माझा भाउ निलेश हा त्याचे रुममध्ये गेला तेव्हा त्याने दरवाजा बंद केला.थोड्याच वेळात त्याची पत्नी सौ वर्षा ही त्याचे रुमकडे जावून दरवाजाचे फटीमधून वाकून पाहीले असता तीने हंबरडा फोडला. कारण निलेश याने स्लॅबला असलेल्या कडीला रुमालाचे सहायाने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्याला उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा 23 जुलैला मृत्यू झाला. निलेश याचे खीसे पाहीले असता, त्याचे ग्रे रंगाचे लोअर चे खीशात एक चीठठी आढळून आली. आरोपी विरुद्ध
653/2024 कलम 108, 49, 3 (5) भारतीय न्याय संहिता 2023 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
▪️काय होते या चिठ्ठीत?
सदर चीठठी मध्ये लीहलेले होते की, मी निलेश दत्तात्रय डूकरे असे लीहून देतो की, मला बाहेरुन जास्त त्रास झाला आहे. माझे सोबत अनिल बाबूराव जाधव, व विलास चिंचोले यांनी माझा नावावर पैसा उचलला आणी मला
बाहेरुन त्रास दिला यांनी मला जुन्या गावात नेवून समोर पाठवून पैसा उचलला आणी मला यात
गुंतवले, आणी मला कर्जबाजारी केले हे सर्व मनोज चंदन याला माहीत आहे तो पण याचेत सामील आहे.माझे अंगावर जेवढे पैसे उचलले हे तीघे त्यात सामील आहे. या तीघांमुळे मी आत्महत्या
करीत आहे. तरी मला न्याय मीळावा माझे घरच्यांची काहीच गलती नाही. मला या तीघांनी फसवीले आहे या तीघांकडून पैसे वसुल करण्यात यावे. मनोज चंदन आणि अनिल बाबुराव जाधव यांना सर्व माहीती आहे यांचेमुळे मी आत्महत्या करीत आहे.