11.5 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

spot_img
spot_img

राणाजी माफ करणार नाहीत! -कारण ही तसेच आहे..

खामगाव (हॅलो बुलढाणा) राजकीय आश्रयाखाली निकृष्ट दर्जाची विकासकामे करुन जनतेच्या पैसा लुटणाऱ्यांच्या पर्दाफाश करु, असा थेट इशारा देत माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा खामगाव विधानसभाच्या मैदानात उतरले आहेत.

गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी श्री क्षेत्र अटाळी येथे कॉग्रेस महाविकास आघाडीच्या वतीने जनसंवाद परिवर्तन संकल्प यात्रेचा शुभारंभ मा. आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी बोलतांना सानंदा म्हणाले की, मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामचंद्राचा अपेक्षित असलेले लोककल्याणकारी राज्य आणण्यासाठी खामगांव मतदार संघातील घरा घरापर्यंत जावुन जनतेशी थेट संवाद साधुन राजकीय आश्रयाखाली निकृष्ट दर्जाची विकासकामे करुन जनतेचा पैसा लुटणाऱ्याचा पर्दाफाश करुन व टोल सम्राटचा चेहरा जनतेसमोर आणणार आहे. दरम्यान सानंदा यांनी श्री क्षेत्र अटाळी येथे येथील प.पू.श्री संत भोजने महाराजांच्या मंदिरात प.पु भोजने महाराजांच्या मुर्तीचे पुजन करुन दर्शन घेतले.बळीराजा सुखी समृद्ध व्हावा व टोल सम्राटाचा पर्दाफाश करण्याची शक्ती मिळावी अशी प्रार्थना मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी प.पू भोजने महाराजांच्या चरणी केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!