spot_img
spot_img

विजयराज शिंदे कृष्ण प्रकाश साहेबांना काय म्हणाले असतील बरं?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ज्यांच्या अनेक कारवाया देशभर गाजल्या.ते राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक (फोर्स वन), आयर्न मॅन कृष्ण प्रकाश साहेब ( IPS) जिल्हा दौऱ्यावर आले होते. येथे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. थोडीशी चर्चा ही झाली.

विजयराज शिंदे यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन कृष्णप्रकाश यांचे स्वागत केले व निवांत चर्चा केली. विजयराज शिंदे म्हणाले की,आमदार असतांनाच्या कार्यकाळात बुलढाणा जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक म्हणून दबंग कामगिरी केलेली आहे. वरिष्ठ पदावर जाऊन त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा राज्यातच नव्हे तर देशात उमटवला आहे. अश्या पोलीस अधिकाऱ्यां विषयी आत्मीयता आजही कायम आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या अनेक धाडसी निर्णया बद्दल आजही त्यांचे कौतुक बुलढाणा जिल्हा वासीयांच्या तोंडून होते.त्यांच्या समवेत अनेक जुन्या आठवणीना या निमित्ताने उजाळा मिळाला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!