बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी … 24 जुलैपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होण्याला सुरुवात होणार आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पिक विमा नुकसान भरपाई संदर्भात विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून तात्काळ नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा असे निर्देश दिले होते त्यानुसार पिक विमा कंपनीकडून ही कारवाई होत आहे.
बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विविध विभागांची आढावा बैठक केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली या बैठकीत पिक विमा संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला धारेवर धरत पिक विमाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात अजून पर्यंत का पैसे जमा झाले नाहीत असा जाब यांनी विचारला होते व या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ही दूरध्वनीवरून संपर्क साधला होता त्यानंतर प्रशासकीस्तरावर वेगवान हालचाली होऊन विमा कंपनीने पिक विमा नुकसान भरपाईपासून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून रक्कम त्यांच्या खात्यात पैसे अदा करण्या संदर्भातील कारवाई केली आहे त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील 2266 शेतकऱ्यांना 55030735. कोटी रुपये ,मेहकर तालुक्यातील1613 शेतकऱ्यांना 18546583.04 कोटी रुपये चिखली तालुक्यातील1105 शेतकऱ्यांना 7778670.33 कोटी रुपये सिदखेडराजा तालुक्यातील1010 शेतकऱ्यांना16375684.41कोटी रुपये असे एकूण बुलढाणा जिल्ह्यातील 7820 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी 123145795.5 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून 24 जुलैपासून शेतकऱ्यांच्या खात्यात या नुकसान भरपाई चे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे.