बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आंदोलन सगळेच करतात पण आंदोलनात दम असला पाहिजे! भीम आर्मीने जिल्हा परिषदेला आंदोलनाचे निवेदन देताच जिल्हा परिषद कामाला लागली आहे. हे आंदोलन विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या समस्येसाठी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार करणार होते. परंतु या आंदोलनाची धास्ती घेऊन प्रशासन समस्या सोडवण्यासाठी मार्गी लागले आहेत.
जिल्ह्यातील मराठी शाळांची झालेली दुर्दशा आणि शिक्षकांच्या रिक्त जागांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची झालेली वाताहत पाहता भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी जिल्हा परिषदेला घेराव घालण्याचा इशारा सीईओंना दिला. या आंदोलनाची धास्ती घेत प्रशासन कामाला लागले. शिक्षण विभागाशी संबंधित मागण्या असल्याने प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच विद्यार्थी हिताच्या दृष्टीने सुस्थितीतील स्वच्छतागृह, चांगल्या शाळाखोल्या, पडक्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध केल्याचे लेखी पत्र सतीश पवार यांना दिले आहे.