चिखली (हॅलो बुलढाणा) मुली सैराट झाल्या.. आई बापाची परवा न करता पळून जातात. कुणी फूस लावून पळवतात. जिल्ह्यात असे शेकडो गुन्हे दाखल आहेत. परंतु चिखली तालुक्यातून एका बालकाला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे.
चिखली तालुक्यातील अंबाशी गावातून दहा वर्षीय मुलगा अज्ञात इसमाने पळवून नेल्याचा गुन्हा चिखली पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.
शेख हारुण शेख गणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा मोहम्मद अहरान शेख हारुण हा दिनांक २२ जुलै २०२४ रोजी सकाळी ९ वाजता घरासमोर खेळण्यासाठी गेला होता. दुपारी साडे चार वाजेपर्यंत तो घरी परत न आल्याने त्याच्या आईने त्याच्या शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु, त्याचा कुठेही पत्ता लागला नाही.अखेरीस शेख हारुण यांनी चिखली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी पळवून नेलेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.
▪️ या बालकाचे वर्णन असे आहे..
रंग: सावळा
केस: काळे
चेहरा: लांबट
उंची: ४ फूट
बोलीभाषा: हिंदी
पोशाख: काळ्या रंगाचा हाफ बाह्यांचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स पॅंट
▪️अतिरिक्त माहिती..
पळवून नेलेल्या मुलाला तुम्ही कुठेही पाहिल्यास त्वरित चिखली पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधा. तुम्ही मुलाबद्दल कोणतीही माहिती असल्यास तीही पोलिसांना द्या.
माहिती पुरवणाऱ्यांना बक्षीस दिले जाईल. माहिती गोपनीय ठेवली जाईल.