spot_img
spot_img

भ्रष्टाचारी हाजीर हो! पण तारीख पे तारीख!

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे हे सर्वांनाच माहित आहे. परंतु कारवाईचा ससेमिरा कुणाकुणाच्या पाठीशी लागलेला आहे याची माहिती ‘हॅलो बुलढाणा’ ला माहित झाली आहे. परंतु आरोपी ‘तारीख पे तारीख’मुळे सध्या मोकळे आहेत.10 जून 2024 रोजी जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, बुलढाणा व त्यांच्या अधिनस्त कार्यालयामध्ये उपकरणे व साहित्य खरेदी प्रक्रिया आर्थिक
अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी मा. लोकायुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली. ही तक्रार चंद्रकांत खरात, बुलढाणा सहसंचालक यांनी वरिष्ठांना केली होती. दरम्यान तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी पथकामार्फत केलेल्या चौकशी अहवालानुसार संबंधित अधिकारी व कर्मचारी याच्याविरुध्द म.ना.से. नियम (शिस्त व अपील) १९७९ मधील नियम ८ व १२ अन्वये संयुक्तीक विभागीय चौकशीचा प्रस्ताव शासनास (कार्यासन सेवा – ४ ब) सादर केलेला आहे. सदर बाब संचालक, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांनी या प्रकरणी लोकायुक्त यांच्याकडे आयोजित सुनावणीच्यावेळी मा. लोकायुक्त यांच्या निदर्शनास आणली. त्यावर लोकयुक्त महोदयांनी, सदर प्रकरणात दोषी आढळुन आलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्याविरुद्ध सादर केलेल्या संयुक्त विभागीय चौकशीच्या प्रस्तावावर नियमानुसार ०३ महिन्यात निर्णय
घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसेच या पुढील सुनावणी माहे सप्टेंबर, मध्ये ठेवण्यात येणार असुन त्यावेळी अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!