देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) परमपूज्य 108 भारत गौरव स्वर्ग विजेता विशाल संघनायक समाधी सम्राट गणाचार्य श्री 108 विरागसागरजी महामुनी राज यांच्या धर्मप्रभावक श्रमणी आर्यीका 105 विचक्षणाश्री माताजी तथा ससंघ चारपिंची धर्मनगरी देऊळगाव राजा येथे चातुर्मास महा निमित्ताने वास्तव्यास आहेत त्या अनुषंगाने आज दिनांक 20 जुलै रोजी चातुर्मास मंगल कलशाची स्थापना करण्यात आली यावेळी दिगंबर जैन समाजाचे वतीने चातुर्मासात विविध मंगल कलश यांची बोली द्वारे स्थापना करण्यात आली तर मुख्य कलशासाठी भाग्योदय कुपन व्दारे स्थापन करण्यात येणार आहे यामध्ये सम्यक दर्शन मंगल कलश सम्यक ज्ञान मंगल कलश सम्यक चारित्र्य मंगल कलश विरागोदय मंगल कलश व विराग विचक्षण वर्षायोग मंगल कलश 2024 चा समावेश आहे आज सकाळी पार्श्वनाथ भवन मध्ये चातुर्मास कलश स्थापना निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते व जैन समाजाचे वतीने चातुर्मास महा निमित्ताने वास्तव्य असलेल्या जैन माताजी यांना वस्त्रभेट, शास्त्र भेट सन्मानपूर्वक देण्यात आली तर उपस्थित सर्व माताजी यांचे पाद प्रक्षालन करण्यात आले संगीतमय वातावरणात सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडले तर या धर्मसभेला संबोधित करताना श्रमन आर्यिका 105 विचक्षणा श्री माताजी यांनी सांगितले की जैन धर्मात तपाच्या मैत्रीला फार महत्त्व आहे ज्ञान दर्शन आणि चरित्र या मार्गावर परिक्रमण करीत जीव सुगतीला प्राप्त करू शकतो प्रबळ इच्छाशक्तीचे धनवान आणि कार्याच्या कष्टाला सहन करीत क्षमता धारण करून वीर होतो असे त्यागी व तपस्या करणारे समजल्या जातात पावसाळ्यामध्ये पाऊस पडत असल्यामुळे रस्ते बंद होऊन जातात असंख्य सूक्ष्मजीव किडे उपलब्ध होतात डोंगर दर्यावर हिरवा शालू नेसल्या जातो या परिस्थिती कडे पाहून अहिंसा महाव्रत धारी करुणामूर्ती दिगंबर मुनिराज आपल्या विहाराला थांबवतात , चातूर्विर्थ संघ मुनी आर्यिका श्रावक श्राविका भगवंतांच्या भक्ती भावात विलीन होऊन जातात इतर वेळेस विहार सुरू असताना व ज्या ज्या ठिकाणी वास्तव्यास असतात त्या त्या ठिकाणी वेळ कमी मिळतो पावसाळ्यात चातुर्मास निमित्ताने एकाच ठिकाणी राहून साधना स्वाध्याय आणि तप यांची वृद्धी होते पावसाळ्यात योग ला अर्थ गणिताच्या भाषेत जोडणे होते मुनिंच्या एका ठिकाणांच्या वास्तव्यामुळे श्रावकांना स्वाध्याय साधना पाठ आणि पूजा अर्चना गुरु सेवा करणे याची संधी प्राप्त होते श्रावकांना मुनी राजां सोबत जोडण्याची संधी उपलब्ध होते म्हणून मुनीराजांच्या चर्याला जवळून बघण्याची संधी मिळते व स्वतःला मोक्षमार्गात जाण्याची भावना जागृत होते शास्त्राच्या अनुसार चातुर्मास महा आषाढ शुक्ल चतुर्दशी पूर्व रात्रीपासून आरंभ होऊन कार्तिक कृष्ण चतुर्दशी पश्चिम रात्रीपर्यंत मानतात शहरात वास्तव्यास असलेल्या श्रमन आर्यिका 105 विचक्षनाश्री माताजी, श्रमन आर्यिका का 105 विशुभ्रताजी माताजी, श्रमण आर्यिका 105 विमोचनाश्री माताजी, शुल्लीका शु. 105 विभूशनाश्री माताजी यांचा जैन धर्मियांच्या वतीने मनोमन सेवा करण्याचा संकल्प सर्व समाज बांधवांनी केलेला आहे, सर्व धार्मिक कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व जैन समजाचे नागरिक,महिला,युवती ,युवक, परिश्रम घेत आहे.
- Hellobuldana