चिखली (हॅलो बुलढाणा) चिखलीत अनेक चोरी, गुन्हेगारी व फसवणुकीचे प्रकार घडत आहे. मात्र पोलिसांचा पुढील तपास सुरूच आहे.
चिखली एमआयडीसी येथील बालाजी एग्रो इंडस्ट्रीज चे राजेंद्र बाबूलाल अग्रवाल यांच्या जबानी रिपोर्ट वरून अकोला येथील अरिहंत कैनवासिंग फर्म चे नवलचंद सोहालाल जैन व पराग शहा या एजंट मार्फत वणी जिल्हा यवतमाळ यांना ३० डिसेंबर २०२३ रोजी १९ लाख ४ हजार २७ रुपये (जीएसटी सह) किंमतीचे ३०४.१० क्विंटल सोयाबीन विकली होती. परंतु वारंवार पैश्याची मागणी केल्यावरही पैसे न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे समजताच राजेंद्र बाबुलाल अग्रवाल यांनी चिखली पोलिसांकडे तक्रार दिली, त्यावरून संबंधित लोकांविरुद्ध विविध कलमांव्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.चिखली येथील राजेंद्र बाबुलाल अग्रवाल हे चिखली एमआयडीसी मध्ये स्थित बालाजी ऍग्रो इंडस्ट्रीज चे माध्यमातून शेतकऱ्यांकडून कृषी माल खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात व सदर विकत घेतलेला माल हा दलाला मार्फत मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांना विकतात. अकोला येथील नवलचंद सोहलाल जैन व पराक्षा यांचे अकोला स्थित अरिहंत कॅनवासिंग नावाची फार्म असून ते दोघेजण त्या फॉर्मच्या माध्यमातून शेतमालची खरेदी विक्रीचे व्यवहार कमिशन एजंट म्हणून करतात. त्यांच्यासोबत अग्रवाल मागील एक वर्षात बालाजी ऍग्रो इंडस्ट्रीज च्या माध्यमातून दहा ते बारा वेळा सुरळीत व्यवहार झाल्यामुळे त्यांची व संबंधित लोकांसोबत चांगली ओळख झाली होती. दिनांक २७ डिसेंबर २०२३ रोजी अकोला येथील कमिशन एजंट पराग शहा यांचा अग्रवाल यांना फोन आला व त्यांनी सांगितले की वनी जिल्हा यवतमाळ येथील गोयनका प्रोटीन्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे मालक गणेश शिवशंकर गोयनका यांना १ हजार क्विंटल सोयाबीन (१०० टन) माल ५ हजार १० रुपये या भावाने पाहिजे आहेत. तेव्हा अग्रवाल यांनी सांगितले की माझ्याकडे केवळ ३०० क्विंटल सोयाबीन उपलब्ध आहे. तेव्हा त्यांनी म्हटले की ठीक आहे ३०० क्विंटल सोयाबीन मालवणी जिल्हा यवतमाळ येथे पाठवून द्या, सदर मालाचे पैसे गोयनका हे आठ दिवसानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये टाकतील, असा सौदा पक्का झाल्यानंतर दिनांक २७ डिसेंबर २०२३ रोजी अग्रवाल यांच्या व्हाट्सअप नंबर वर अकोला येथील नवलचं जैन यांनी सोयाबीनच्या सौद्याबाबत गोयनका प्रोटीन प्रायव्हेट लिमिटेड चे कॉन्ट्रॅक्ट लेटर – कॉन्ट्रॅक्ट नोट पाठवली होती. सदर कॉन्ट्रॅक्ट लेटर बघून अग्रवाल यांनी दिनांक ३० डिसेंबर २०२३ रोजी ३०४.१० क्विंटल सोयाबीन किंमत १५ लाख ९९ हजार ७१८ व जीएसटी चे ३ लाख ४ हजार ३०९ रुपये किमतीचे सोयाबीन हे संबंधित व्यापाराला पाठविला तर सदर माल समोरील व्यापाऱ्याला दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी मिळाला होता. सदरचा सोयाबीन माल गोयनका प्रोटीन्स प्रायव्हेट लिमिटेड यांना पोहोचल्या नंतर अग्रवाल यांनी १० दिवसानंतर ठरल्याप्रमाणे अकोला येथील अरिहंत यांच्यासिंग चे संचालक नवलचंद जैन यांच्याशी मोबाईलद्वारे सोयाबीन मालाचे पेमेंट १५ लाख ९९ हजार ७१८ व जीएसटी चे ०३ लाख ०४ हजार ३०९ रुपये बाकी असून ते अद्याप पावतो प्राप्त झाले नाही ते कधी देणार? याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले. मला कॅन्सर झाला आहे माझी मुले पैसे अदा करणार. परंतु नंतर ही टाळाटाळ करण्यात आल्याने, पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली तक्रारीवरून चिखली पोलिसांनी गणेश शिवशंकर गोयनका, केतन गणेश गोयनका, नवलचंद सोहलाल जैन व पराग शहा यांच्याविरुद्ध दिनांक १५ जुलै २०२४ रोजी भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ४२०, ४०९, ३४ नुसार गुन्हे दाखल केले असून चिखली पोलीस सदर लोकांचा शोधकामी लागली आहे. तर सदर लोक अजूनही पोलिसांना मिळून न आल्याने ते सर्व फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.