spot_img
spot_img

तो रस्ता आ. संजय गायकवाड करतील?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) चिखली रोडवरील संत गाडगेबाबा नगर येथील निसरडा रस्ता अपघाताची घंटा देतोय! या रस्त्यावरील थोडे अतिक्रमणही सुंदरखेड च्या सरपंच अर्पणा चव्हाण यांनी स्वतः उभे राहून काढले. परंतु एका महिलेने प्रखर विरोध केला. घटनास्थळी पोलीस आले होते. दरम्यान सरपंच व इतर लोकप्रतिनिधी देखील हलबल झाले आहे. परंतु आमदार संजय गायकवाड हा रस्ता करणारच.. अशी आस लागून आहे.

चिखली रोडवरील संत गाडगेबाबा नगर येथील रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे. येथे राहणाऱ्यांची मोठी संख्या आहे. परंतु हा रस्ता अनेक वर्षापासून नरक यातना भोगत आहे. दरम्यान ग्रामस्थ व नारी शक्ती एक वाटली. त्यांनी थेट सरपंच आमदार यांना रस्ता करण्याची विनवणी केली. या रस्त्यासाठी सरपंच अर्पणा चव्हाण ऑन द स्पॉट पोहोचल्या. येथे अतिक्रमण होते. त्यांनी अतिक्रमण काढायला सुरुवात देखील केली. परंतु एका महिलेने याला विरोध केला. दरम्यान आमदार संजय गायकवाड ही येथे आषाढी एकादशीला मंदिराच्या पूजनानिमित्त आले होते. त्यांनी देखील ही समस्या जाणून घेतली. परंतु रस्त्याचे काय होईल? हा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. आमदार गायकवाड यांनी हा प्रश्न सोडविणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!