spot_img
spot_img

अन्न औषध प्रशासन नेमकं करते काय? -मुदत बाह्य औषधींची सर्रास विक्री!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मुदतबाह्य औषध दिल्याने, एकाने संबंधित औषधालयाची तक्रार केली आहे. परंतु अन्न औषध प्रशासन यावर काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तक्रारकर्ता वैभव शेळके यांनी म्हटले की, डॉ. पोहरकर यांच्या बिल्डिंग मधील श्री विद्या मेडिकल येथून रुग्णाला मुदत संपलेली औषधी दिल्यामुळे संबंधित सर्व डॉक्टर, सर्व मेडिकल, लायसन्सधारक आणि मेडिकल चे मालक यांचेवर कठोर कारवाई करून मेडिकलला सिल लाऊन संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल. पुढे ते म्हणाले की,
(आइट स्किन केअर हॉस्पिटल, चिखली) यांच्या हॉस्पिटल मध्ये इलाज करण्यासाठी गेलो असता त्यांनी माझी तपासणी करून औषधी लिहून दिली आणि श्री विद्या मेडिकल येथून औषधी घेण्यास सांगितले. मी त्यांच्या म्हणण्यानुसार औषधी घेतल्यानंतर दाखविण्यास गेलो असता त्यांनी औषधी न बघता फाईल वर दिलेले आहे त्यावरून औषधी घेण्यास सांगितले. (२ मलम, टॅबलेट) मी सायंकाळी घरी गेल्यानंतर डॉक्टर ने सांगितल्याप्रमाणे वापरली व सकाळी उठलाय त्रास होण्यास सुरवात झाली.

आणि मला पूर्णपणे इन्फेक्शन वाढलेले आहे. दरम्यान औषधाची पाहणी केल्यास त्यामध्ये
cream Fucidin cream (SGM) या क्रीम ची मुदत संपून तीन महिने झालेले होते आणि त्यानंतर मी 17 जुलै ला कॉंग्रेस तालुका अध्यक्ष मनोज जाधव यांना सोबत घेऊन मेडिकल ला विचारपुस केले असता तुम्ही मुदत संपलेला औषधी का दिली? व दिलेल्या क्रीम
वरील रकमेपेक्षा जास्त पैसे घेण्यात आले व
बिलावर दिलेली औषधी नवीन स्टॉक नुसार लावली असता आम्हाला सांगण्यात आले
की चुकीने दिल्या गेले असेल त्यानंतर आम्ही पत्रकारांसह मेडिकल मध्ये जाऊन पाहणी केल्यास 4-5 क्रीम मुदत संपलेल्या आढळून
आल्या. डॉ. पोहरकर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, एक महिन्यापूर्वी औषधीचे इन्स्पेक्शन औषध निरीक्षक
करुन गेलेले आहे असे सांगितले तरी सुद्धा तीन महिन्याची मुदत संपलेली औषधी राजरोषपणे विक्री सुरू आहे. मेडिकल च्या अशा
गैर वर्तनुकिमुळे रुग्णाचा जीव सुद्धा जाऊ शकतो. मग अन्न औषध प्रशासन करते तरी काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!