बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयामध्ये सर्पदंश आणि विषबाधा संदर्भातील औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवा असे निर्देश केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिलेत
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या नियोजन समितीच्या सभागृहामध्ये 19 जुलैला विविध विभागांची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीदरम्यान आरोग्य विभागाची आढावा बैठक घेत असताना उपरोक्त सूचना आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी केल्यात ते म्हणाले म्हणाले की सध्या खरिप हंगामाचे दिवस सुरू आहेत शेतात काम करत असताना शेतकरी शेतमजूर याना सर्पने दंश केल्याच्या घटना घडतात शिवाय पिकांवर कीटकनाशक औषध फवारणी करतांना अनेकवेळा विषबाधा होण्याची शक्यता असते तेव्हा अशा पिढीत रुग्णांना तात्काळ औषध उपचार मिळणे गरजेचे असते ..जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा ग्रामीण आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्पदंश आणि विषबाधा संदर्भातील औषधेचा साठा उपलब्ध ठेवा व तिथे येणाऱ्या रुग्णांना आरोग्य सेवा द्या अशा सूचनाही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ भागवत भुसारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गीते आणि स्त्री रुग्णालयाचे प्रमुख डॉ प्रशांत पाटील यांना दिल्या रायपूर येथे उद्भवलेल्या आजारा संदर्भातील माहिती ही मंत्री महोदयांनी घेऊन तेथील रुग्णांच्या औषध उपचार देण्यासाठी विशेष कॅम्प लावण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले …