बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्हा सहकारी बँकेला तीनशे कोटींचे विशेष पॅकेज मिळाल्याने आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांचा तिथे सत्कार घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. राजेंद्र शिंगणे होते. दरम्यान सत्काराला उत्तर देताना थेट रविकांत तुपकर यांच्यावर ना.जाधव यांनी तोफ डागली. याचे प्रत्युत्तर ही रविकांत तुपकर यांनी आक्रमकपणे दिले आहे. त्यांनी थेट प्रतापरावांचा प्रतापच चव्हाट्यावर आणायचा निर्धार केलाय.
राष्ट्रवादीचे सुप्रीम शरद पवार यांचे निकटवर्तीय डॉ. शिंगणे तीनशे कोटीला बळी पडून,अजित पवार गटात सामील झाले. तत्पूर्वी त्यांना 300 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. दरम्यान त्यांनी मोठा सत्कार सोहळा आयोजित केला. यामध्ये आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांना बोलविण्यात आले. सत्काराचे उत्तर देताना, जाधव यांनी स्वाभिमानी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यावर टीका केली. ही टीका अयोग्य होती. दरम्यान रविकांत तुपकर यांनी आक्रमकपणे म्हटले की, बँक बुडवायची वेळ कशी काय आली? सहकारी संस्था व कारखान्यांना कर्ज दिले. यामध्ये प्रतापराव जाधव यांचा मोठा वाटा होता. बँक बुडविण्यास जाधव कारणीभूत आहेत. आणि आता त्याच बँकेत सत्कार करून घेणे खेदाची बाब आहे. ‘जखमेवरच्या खीपल्या काढू नका.. अन्यथा आयुष मंत्री जाधवांचे अनेक भ्रष्ट प्रकरण चव्हाट्यावर आणू… असा इशारा देखील तूपकरांनी दिला आहे.