spot_img
spot_img

वाटेची पूर्ती वाट लागली, तरीही वाटेची वाट!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरातील प्रभाग क्रमांक ०८ मधील श्री. महादेव चव्हाण ते श्री. सुनिल परसे यांच्या घरापर्यंत तसेच या रस्त्याशी संलग्न असलेले तिन पक्के रोड तयार करून मिळावे यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

अनेक वर्षापासून येथील रहिवासी वास्तव्य करीत असून नगर परिषद कार्यालय, बुलडाणा कार्यालयाचे सर्व प्रकारचे कर वेळेवर भरतात.
तरी सुध्दा प्रभाग क्रमांक ०८ मधील अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे रोड करुन दिलेले नाही. पावसात किंवा पावसाळी वातावरण असेल तेंव्हा रस्त्याने जाणे येणे मुश्कील होऊन जाते. प्रसंगी जीवावर बेतते. या आधी आमदार संजूभाऊ गायकवाड यांना या बाबतीत निवेदन सादर केलेले आहे. परंतु अद्यापपर्यंत त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे रस्ता करून द्यावा अशी मागणी श्री. महादेव चव्हाण सर यांच्या घरापासून श्री. अनिल साळवे यांच्या घरासमोरुन श्री. सुनिल परसे यांच्या घरापर्यंत. पूर्वे पश्चिम सिमेंट वा डांबरी पक्का रोड तयार करुन देण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली आहे.

▪️ या रस्त्याकडे लक्ष द्या..

याच रस्त्यावरील उत्तर ते दक्षिण तिन रोड आहेत तेथेही अनेक घरे आहेत. पहीला रोड हा श्री. समाधान वाघ यांच्या घरासमोरुन श्री. प्रमोद डिडोळकर यांच्या घरापर्यंत उत्तर से दक्षिण ५० मिटरचा रोड आहे. दुसरा रोड हा श्री. प्रकाश मोकळे यांच्या घरासमोरुन प्रियंका सुरुशे यांच्या घरापर्यंत उत्तर ते दक्षिण १००
मिटरचा रोड आहे. तिसरा रोड हा श्री. नरोटे यांच्या घरासमोरुन श्री. क्षिरसागर यांच्या घरापर्यंत उत्तर ते दक्षिण १०० मिटरचा रोड
आहे.रस्त्याची प्रत्यक्ष येऊन पाहणी करुन आपण डांबरी रोड किंवा सिमेंट कॉंक्रीटचा रोड करुन दिल्यास जाण्या येण्यास सुलभ होइल. सदर रस्त्यावरुन सत्तर घरातील रहीवाशी. कार्यालयीन पुरुष व महिला कर्मचारी येणे जाणे करतात. हे तर जातातच परंतु शाळेला, कॉलेजला जाणाऱ्या आमच्या मुलांना / मुलींना चिखलातून जावे लागते त्यांचे शाळा /कॉलेजचे गणवेश, बुट पुर्ण खराब होतात इतका त्रास सहन करावा लागतो. नेहमी चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.

▪️ नंतर वास्तव्यास आलेल्याना सुविधा..

या भागात नंतर वास्तव्यास आलेल्या घरासमोरील रोड तयार झालेले आहेत परंतु तक्रारदारांच्या घरासमोरील रोड का होत नाही हा प्रश्न इथे वास्तव्यास असलेल्या रहिवाश्यांच्या मनात निर्माण होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!