बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सध्या उल्कानगरीत सौंदर्य अधिक खुलले आहे. येथे पर्यटकांची गर्दी होत असून लोणार सरोवराने देश विदेशाला भुरळ पाडली आहे.
महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील भव्य लोणार सरोवर हे सगळयांनाच माहीतच आहे. आज आम्ही तुम्हाला या सरोवराच्या काही रहस्यांबाबत सांगणार आहोत. साधारणपणे ५ लाख ७० हजार वर्ष जुनं असलेल्या या सरोवराचा उल्लेख वेदांमध्ये, पुराणांमध्ये आणि अनेक दंतकथांमध्ये आहेत. नासाने अनेकदा यावर संशोधन सुद्धा केलं आहे. हे सरोवर उल्कापातामुळे तयार झालं आहे.
सत्तराव्या दशकात वैज्ञानिकांचं असं म्हणणं होतं की हे सरोवर ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे तयार झालं आहे. पण हे चुकिचं ठरलं. कारण जेव्हा सरोवर ज्वालामुखीपासून तयार होतं. त्यावेळी १५० मिटर खोल असतं. २०१० च्या आधीपासून असं मानलं जातं होतं की हे सरोवर ५२ हजार वर्ष जुनं आहे. पण अलिकडे केलेल्या संशोधनानुसार हे सरोवर ५ लाख ७० हजार वर्ष जुनं आहे.लोणार सरोवराजवळ प्राचीन मंदिरं सुद्धा आहेत. त्यात दैत्यासुदन मंदिर सुद्धा आहे. हे भगवान विष्णू, सुर्य,दुर्गा आणि नरसिम्हाला समर्पण करण्यात आले आहे.