बुलढाणा (हॅलो बुलढाणा) माझी लाडकी बहीण योजना निवडणुकी पूरतीच का? असा प्रश्न अनेक बहिणी विचारत आहेत. निवडणूक झाल्यावर ही योजना बंद पडणार असा अनेकांचा संभ्रम आहे.
राज्य शासनाची महत्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करण्यास सुरवात झाली आहे. आजपर्यंत 1 लाख 10 हजार अर्ज दाखल करण्यात आले आहे. यात 70 हजार ऑफलाईन, तर 40 हजार अर्ज ऑनलाईन दाखल करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आजपर्यंत 1 लाख 10 हजार 779 महिलांनी अर्ज दाखल केले आहे. यात 70 हजार 10 महिलांनी ऑफलाईन, तर 40 हजार 769 महिलांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहे. जिल्ह्यात 4 लाख 97 हजार 651 संभाव्य पात्र महिला आहेत.