बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरासह जिल्ह्यात डेंग्यूची रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे काही भागांत होणाऱ्या गढूळ पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी साथ रोगांचा प्रसार होऊन डेंग्यू घोंगावतोय.. जिल्ह्यात आतापर्यंत 33 रुग्ण बाधित आहेत.
शहरासह जिल्ह्यातील काही भागांत गेल्या काही दिवसांपासून अशुद्ध व तांबूस रंगाचा पाणीपुरवठा होत असल्याने आरोग्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे या परिसरात नगरपालिकेने व ग्रामपंचायतने
त्वरित उपाययोजना करून सुरळीत व
शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी
परिसरातील नागरिकांनी केली आहे.काही भागांत पाणीपुरवठा अनियमित
तसेच दुर्गंधीयुक्त होत असल्याने नागरिकांमध्ये पोटदुखी, जुलाब व उलट्या यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.असाच गढूळ पाणीपुरवठा होत असला तर साथरोगांना आणखी आजारांची साथ मिळेल.










