बुलढाणा (हॅलो बुलढाणा) गेल्या आठ दिवसापासून नगरपालिकेची जलवाहिनी ठिकठिकाणी फुटली असून लाखो लिटर फिल्टर झालेल्या पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. एवढेच नाही तर नागरिकांच्या घरात या पाण्याचा शिरकाव होत असल्याने नागरिक हैराण झाले आहे.
शहरातील चिखली रोड वरून जाताना, राजश्री शाहू बँकेसमोर हे दृश्य पाहायला मिळेल. खरे तर नगरपालिका पाणीपुरवठा विभाग केवळ आणि केवळ पगारापुरता कामावर आहे का? असा प्रश्न नागरिक करीत आहेत. शहरातील अनेक ठिकाणी दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. एकीकडे पाण्याची बचत करा.. असा संदेश शासनासह प्रशासन देते.. परंतु नगरपालिका प्रशासन याबाबत जाणीवपूर्वक अनभिज्ञ आहे. न.प प्रशासनाला दररोज विविध समस्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या तरी ते दुर्लक्ष करतात,असा आरोप नागरिकांचा होत आहे. दरम्यान फुटलेल्या जलवाहिन्या तात्काळ दुरुस्त करा अन्यथा नगरपालिका वर मोर्चा काढण्यात येईल,असा इशारा संतप्त झालेला नागरिकांनी दिला आहे.